पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पतीच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे. याप्रकरणी पती विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
नेहा प्रणय ठाकूर Neha Prannoy Thakur (वय-26 रा. जिजाई विहार, मानाजीनगर, नऱ्हे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राजकुमारी ठाकूर (वय-55 रा. कोलार रोड, भोपाळ, मध्यप्रदेश) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रणय ठाकूर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहाचा पती प्रणय ठाकूर हा गेल्या काही दिवसांपासून तिचा छळ करत होता.
घरकामावरुन तिला टोमणे मारुन शिवीगाळ करत होता. तसेच तिला मारहाण (Beating) करण्यात आली.
पतीच्या छळाला कंटाळून नेहाने राहत्या घरामध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लाड (PSI Lad) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा