Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! धमकी देऊन तरुणीवर बोपदेव घाटात बलात्कार, दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोंढवा परिसरातील (Kondhwa) बोपदेव घाटात (Bopdev Ghat) नेऊन एका तरुणीवर बलात्कार (Rape In Pune) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन बजरंग जयवंत रुमाले Bajarang Jaywant Rumale (वय-21) आणि त्याच्या मित्राविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पीडित तरुणीचे आजोबा नांदेड येथे राहायला होते. आजोबांचे निधन झाल्याने ती मे 2023 मध्ये नांदेडला गेली होती. नांदेड येथे आरोपी रुमाले याच्यासोबत तिची ओळख झाली. त्यानंतर तरुणी पुण्यात परतली. तरुणीच्या पाठोपाठ आरोपी रुमाले आणि त्याचा मित्र पुण्यात आले.

आरोपींनी पीडीत तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
तरुणीला धमकावून रुमाले याने बोपदेव घाटात घेऊन गेला.
आरोपींनी तिच्यावर बलात्कार करुन अनैसर्गिक कृत्य केले. पीडीत तरुणीने कोंढवा पोलिसांकडे तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Girish Mahajan On Eknath Khadse | ‘त्यांना सगळी पदं आपल्याच घरात पाहिजेत’, खडसेंच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचा टोला

Teachers Recruitment In Maharashtra | टीईटी गैरप्रकार प्रकरणातील उमेदवारांना संधी, स्व-प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

Rohit Pawar | शरद पवार व गौतम अदानी भेटीवर रोहित पवारांनी मांडले स्पष्ट मत; म्हणाले…

Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू