Pune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा धाक दाखवून चालकाला लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे स्टेशनहून उरुळी कांचनला जाण्यासाठी गाडी ठरवून प्रवासी म्हणून बसलेल्या दोघांनी वाटेत चाकूचा धाक दाखवून कॅबचालकाला लुटून त्याची चारचाकी गाडी चोरुन नेली. हा प्रकार हवेली तालुक्यातील शिंदावणे गावाजवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता (Pune Crime) घडला.

याप्रकरणी सुनिल यशंवत शेडगे (वय ३५, रा. मुंबई) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. सुनिल शेडगे हे पुणे स्टेशन येथे भाडे घेण्यासाठी थांबले असताना दोघे जण त्यांच्याकडे आले. त्यांनी उरुळी कांचन येथे जाण्यासाठी भाडे ठरविले. त्यानुसार ते गाडीने जात असताना पुणे सोलापूर रोडवरील (Pune-Solapur Highway) लोणकर वस्तीच्या पुढे आल्यावर गाडीतील दोघा प्रवाशांनी फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील मोबाईल व पाकिटातील १२०० रुपये जबरदस्तीने काढून (Pune Crime) घेतले. त्यानंतर त्यांना खाली उतरुन साडेचार लाख रुपयांची चारचाकी गाडी चोरुन नेली. सहायक पोलीस निरीक्षक महानोर तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | On Pune-Solapur highway raod, passengers threatened the cab driver and stole the vehicle; Frightened with a knife, the driver was robbed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला, ओमिक्रॉन नाही तर आढळला कोरोनाचा ‘हा’ व्हेरिएंट

Thane Crime | धक्कादायक ! 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी लग्न; नंतर 27 वर्षांच्या जावयाकडून सासूवर बलात्कार

Investment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र, ‘हे’ अवलंबल्याने बनू शकता श्रीमंत; जाणून घ्या

Electricity Mobility Promotion Policy | गाडी खरेदी करणार्‍यांसाठी खुशखबर ! ‘हे’ सरकार देतंय 3 लाखापर्यंत सबसिडी, जाणून घ्या