Pune Crime | संतापजनक ! डिलीव्हरी बॉयची तरुणीवर अश्लील शेरेबाजी, KISS घेण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात (Pune Crime) एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर मुंबईच्या साकीनाका भागात महिलेवर अमानुष अत्याचार (Saki Naka Rape Case) केल्याची घटना घडली. मागील काही दिवसांपासून राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच दरम्यान पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad) एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरातील महिला सुरक्षीत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad police station) हद्दीत एका 30 वर्षीय तरुणी भावासह घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या स्विगी फूड डिलिव्हरी बॉयने (Swiggy food delivery boy) अश्लील (obscene) शेरेबाजी करत तिला बळजबरीने मिठी मारुन चुंबन (Kiss) घेण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने वाकड पोलीस ठाण्यात डिलिव्हरी बॉय विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनी 20 ते 25 वर्षाच्या विकृत तरुणाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी नेपाळ (Nepal) येथील असून तिचा भाऊ आणि ती चायनीज (Chinese) विकण्याची गाडी टाकून आपला उदरनिर्वाह चालवतात. सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास भाऊ-बहिण दोघे घरी चालत चालले होते. रात्री कुत्रे भुंकत असल्याने भाऊ पुढे कुत्र्यांना हाकलत चालला होता. तेवढ्यात अचानक दुचाकीवरुन आलेल्या स्विगी डिलिव्हरी बॉयने तरुणी एकटी असल्याचे पाहून तरुणीच्या जवळ येत अश्लील शेरेबाजी केली. दुचाकीवरुन एका हाताने मिठी मारुन गालाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्लील शेरेबाजी करुन अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.

पीडित तरुणीच्या भावाला पाहताच डिलिव्हरी बॉय तेथून पळून गेला.
या घटनेमुळे तरुणीच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
यापूर्वी देखील शहरात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत. त्यामुळे शहरातील महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे देखील वाचा

Salary Plus Account | जर तुमचे सुद्धा असेल ‘या’ बँकेत सॅलरी अकाऊंट, तर मिळेल एक कोटी रुपयांची ‘फ्री’ सुविधा; जाणून घ्या

Pune Court | अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करणाऱ्या प्रियकराला 15 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा; नुकसानभरपाई म्हणून 1 लाख रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  pune crime | pimpri chinchwad obscene swearing food delivery boy woman walking street

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update