Pune Crime | पिंपरी-चिंचवड शहरात 48 तासात 4 हत्येच्या घटना

पुणे / पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | पुण्यासह पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गुन्ह्यांचे सत्र सुरुच आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरात (Pune Crime) मागील 48 तासात 4 खुनाच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. अशा दैनंदिन घडणा-या घटनेमुळे समाजात एक भितीचे वातावरण पसरले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, हिंजवडी, तळेगाव आणि चिखली परिसरात 48 तासात चार खुनाच्या घटना घडल्या असल्याने शहर हादरुन गेलं आहे.

घडलेली पहिली घटना म्हणजे, एका विवाहित महिलेचा दिराने मित्राच्या मदतीने खून (Murder) करून बलात्कार (Rape) केल्याचं उघड झालं होत.
या सर्व घटनांनी परिसरात खळबळ उडाली, या घटने प्रकरणी आरोपी दिराला पोलिसांनी अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे.
त्याचबरोबर दुसरी घडलेली घटना म्हणजे, पुणे-मुंबई जुना महामार्गालगत असलेल्या घोराडेश्वर डोंगरावर दिरानेच वहिनीवर बळजबरी करत खून केल्याचं समोर आलं.
धक्कादायक बाब म्हणजे मित्राच्या साथीने खून (Pune Crime) केल्याचं समोर आले असून अक्षय कारंडे नावाच्या मित्राने अगोदर महिलेवर बलात्कार (Rape) केल्याचा तपासात समोर आलं आहे.

दरम्यान, तिसरी घडलेली घटना म्हणजे, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या (Hinjewadi Police Station) हद्दीत वॉचमन असलेल्या मित्रांमध्ये मद्यपान करत असताना किरकोळ वाद झाला.
यातूनच एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केला. अच्युत पूर्णा भूयान (वय, 37) असं खून झालेल्या वॉचमनचे नाव आहे. तर, राजन शर्मा (वय, 19) अस आरोपीचे नाव आहे.
दोघे ही आसाम येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
चौथी घडलेली घटना म्हणजे, वीरेंद्र वसंत उमरगी (वय, 42) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
त्याचा मृतदेह चिखली येथील नेवाळे वस्ती येथे आढळून आला.
आरोपी फरार असून त्याचा शोध चिखली पोलीस (Chikhali police) घेताहेत.

 

दरम्यान, अशा सतत घडणा-या धक्कादायक घटनेमुळे समाजात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरने सहाजिकच आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील गुन्हेगारी कमी होईल. अशी भावना सर्वसांमान्यामध्ये होती.
पंरतु, काळजाला थरकाप करणा-या घटना सध्या वाढताना दिसत आहेत.
त्यामुळे पोलिस आयुक्त काय निर्णय घेणार, हे बघणे अपेक्षित आहे.

 

Web Title : pune crime | pimpri chinchwad shook 4 murders in 48 hours question on police department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Amenity Space | ऍमेनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या प्रस्तावावरून भाजपचा ‘यु टर्न’ ! महापौर मोहोळ यांची विषयात पहिल्यांदाच ‘एन्ट्री’

Pune News | राज्यातील नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी आजपासून बेमुदत संप

GMC Solapur Recruitment 2021 | सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती; थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड