Pune Crime | पीएमपी बसचालकाला प्रवाशांची मारहाण; खडकी बस डेपोतील घटनेत ९ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बस प्रवासी घेण्यासाठी थांबली असताना टोळक्याने बसची काच फोडून चालक व वाहक यांना मारहाण (Beating) केली. मदतीला धावून आलेल्या कंट्रोलर यांना छातीवर मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार खडकी बस डेपोत (Khadki Bus Depot) सोमवारी रात्री पावणे आठ वाजता घडला. (Pune Crime)

 

याप्रकरणी बसचालक रामलिंग बेडके Ramling Bodke (वय ४१, रा. चिंचवड) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वैभव ऊर्फ पांडुरुंग आगलावे (Vaibhav alias Pandurung Aglave), यश ऊर्फ मोन्या प्रविण गोपनारायण Yash alias Monya Pravin Gopnarayan (वय १९, रा. महादेववाडी, खडकी), यश चांदणे (Yash Chandane), हर्षद चांदणे (Harshad Chandane), प्रणव काळे (Pranav Kale), शुभम आगलावे (Shubham Aglave), तरंग परदेशी (Tarang Pardeshi), आनंद साळुंखे (Anand Salunkhe), मल्हार अवघडे (Malhar Awghade) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बेडके हे पीएमपी (PMPML Bus) मध्ये चालक आहेत.
त्यांनी प्रवासी भरण्यासाठी बस खडकी स्टँडवर थांबविली होती.
त्यावेळी आरोपींनी आरडाओरडा करुन शिवीगाळ करु लागले. तेव्हा फिर्यादी यांनी आरडाओरडा करु नका,
असे बोलले. त्याचा राग येऊन त्यांनी ड्रायव्हर सीटच्या दिशेने दगड फेकून मारला.
त्यामुळे त्यांच्या समोरील काच फुटून १५ हजार रुपयांचे नुकसान झाले वाहक यांना हाताने मारहाण करु लागले.
तेव्हा कंट्रोलर लहु गायकवाड (Lahu Gaekwad) हे मदतीला आले असताना त्यांना मारहाण केली.
त्यात त्यांच्या छातीला मुका मार बसला. फिर्यादी यांना मारहाण केल्याने ते जबर जखमी झाले आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक कदम (Assistant Police Inspector Kadam) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | PMP bus driver beaten up by passengers; A case has been registered against 9 persons in the Khadki Bus Depot incident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tanaji Sawant | ‘आदित्य ठाकरे एक साधा आमदार, मी त्यांना महत्व देत नाही’

 

Diabetes Symptoms | शरीराचा हा भाग पिवळा होऊ लागला असेल तर व्हा अलर्ट, डायबिटीजचा इशारा तर नाही ना?

 

Pune Pimpri Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात कडप्पा घालून खून