Pune Crime | चरस अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर येथून पुणे शहरात (Pune Crime) अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell, Pune) सापळा रचून अटक केली. अटक (Arrest) करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून 8 लाख 46 हजार रुपये किमतीचे दोन किलो 110 ग्रॅम वजनाचे चरस (Hashish) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पुणे शहरातील (Pune Crime) संगमवाडी (Sangamwadi) येथील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस थांब्यावर (Bus Stop) करण्यात आली.

 

इक्बाल शमीम खान (वय 24, सध्या रा. निगडी, पिंपरी चिंचवड, मूळ रा. राजनगर, नुर इमाम मशिदीशेजारी, अहमदनगर Ahmednagar), फिरोज शरीफ खान (वय 33, रा. बारा इमाम कोटला, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर (Police Inspector Prakash Khandekar) यांना माहिती मिळाली की, संगमवाडी येथील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस थांब्यावर दोन व्यक्ती थांबले असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये चरस हा अंमली पदार्थ आढळून आला. हे दोघे शहरामध्ये अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), हवालदार संतोष देशपांडे, बोमादंडी, चेतन गायकवाड, जाचक, साहिल शेख, जगदाळे आदींनी ही कारवाई केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests two for selling marijuana

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा