Pune Crime | कोंढवा परिसरात गुन्हे शाखेचा छापा; नायजेरियन नागरिकाकडून 2 कोटींचे कोकेन जप्त

0
250
Pune Crime | Pune Police Crime Branch raid in Kondhwa area; Cocaine worth 2 crore seized from a Nigerian citizen
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोंढवा परिसरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका नायजेरियन (Nigerian) नागरिकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अमली पदार्थविरोधी पथक एकने (Anti Narcotics Cell) सापळा रचून अटक (Arrest) केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 2 कोटी रुपयांचे कोकेन जप्त (Cocaine seized) करण्यात आले आहे. आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो नुकताच येरवडा कारागृहातून (Yerawada Jail) जामिनावर बाहेर आला आहे. ही कारवाई (Pune Crime) गुरुवारी (दि.8) उंड्री येथील मंतरवाडीकडे जाणाऱ्या रोडवर करण्यात आली.

 

फॉलरिन अब्दुलअझीज कन्डोई Folarin Abdulazees Andoyi (वय 50, सध्या रा. शकुंतला कानडे पार्क, उंर्ड्री मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) एन.डी.पी.एस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रवीण उत्तेकर यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

अमली पदार्थविरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी कर्मचारी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार प्रवीण उत्तेकर (Pravin Uttekar) व पांडुरंग पवार (Pandurang Pawar) यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील नायजेरियन व्यक्ती उंड्री मंतरवाडी परिसरात कोकेन या अमली पदार्थाची विक्री करीत आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असताना मंतरवाडीकडे जाणाऱ्या रोडवरील आर पॉइंट सोसायटीसमोरील रोडवर आय टेन कार घेऊन आरोपी संशयितरित्या उभा असल्याचा आढळून आला.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे कोकेन हा अमली पदार्थ मिळाला.
पोलिसांनी दोन कोटी 16 लाख 20 हजार रुपये किमतीचे 1 किलो 81 ग्रॅम कोकेन, मोबाइल, आय टेन कार,
दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे, 70 हजार रुपये रोख असा एकूण 2 कोटी 20 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यापूर्वी आरोपीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्टनुसार गुन्हा दाखल असून, काही दिवसांपूर्वी तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Crime Ramath Pokle),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior Police Inspector Vinayak Gaikwad),
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle), शैलजा जानकर (API Shailaja Jankar),
पोलीस अंमलदार प्रवीण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, संदीप शिर्के, सुजित वाडेकर,
राहुल जोशी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेक, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

 

Web Title :-  Pune Crime | Pune Police Crime Branch raid in Kondhwa area; Cocaine worth 2 crore seized from a Nigerian citizen

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indian Railway | रात्री दहानंतर रेल्वेत आवाज केल्यास गाडीतून उतरावे लागेल

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

Mohit Kamboj Target Sushma Andhare | ‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन’ – मोहीत कंबोज