Pune Crime | गुन्हे शाखेचा येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा, गांजाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गांजाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने छापा टाकून अटक केली आहे. आरोपींकडून पुण्यात विक्रीसाठी आणलेला 2 लाख 10 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime) बुधवारी (दि.23) येरवडा परिसरातील ख्रिश्चन स्मशानभूमी समोर करण्यात आली.

 

अजय मुक्तीलाल पवार (वय 28), अरविन सुखलाल सोलंकी (वय 28, दोघे मूळ रा. बडवानी, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची (Pune Crime) नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथक येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. मध्य प्रदेशातील दोन जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ख्रिश्चन स्मशानभूमी जवळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. आरोपींकडून 10 किलो 310 ग्रॅम वजनचा गांजा, मोबाइल, असा एकूण 2 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण,
पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रवींद्र रोकडे,
साहिल शेख, दिशा खेवलकर, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, आझीम शेख, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | pune police Crime Branch raids in Yerwada police station limits, arrests two from Madhya Pradesh for smuggling ganja

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Devendra Fadnavis | सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून विधान, म्हणाल्या – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’

Pune Rural Police | अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडले महागात, पोलिसांकडून पालकांवर खटले दाखल

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…