Pune Crime | झटपट श्रीमंत होण्यासाठी चोरायचा दुचाकी, पण ‘असा’ सापडला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – झटपट श्रीमंत होण्यासाठी पुणे शहरात (Pune Crime) दुचाकी चोरी (vehicle thief) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या (Crime Branch Unit Two) पथकाने अटक (arrest) केली आहे. आरोपीवर पुणे (Pune Crime) आणि परिसरात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीकडून चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चंद्रकांत विष्णू वाघमारे Chandrakant Vishnu Waghmare (वय-27 रा. अंत्रोली, ता. वेल्हे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा (Pune Police Crime Branch) युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई मालधक्का चौकात (Maldhakka Chowk) केली आहे. आरोपीने शिरवळ (Shirwal Police Station), हवेली (Haveli Police Station), सिंहगड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Police Station) हद्दीतून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मालधक्का चौकात एकजण चोरीची दुचाकी घेऊन उभा असल्याची माहिती पोलीस हवालदार नामदेव रेणुसे (Police Constable Namdev Renuse) यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चंद्रकांत वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्या ताब्यात असलेली दुचाकी साधू वासवानी चौकातून (Sadhu Vaswani Chowk) चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून शिरवळ (shirwal police station), हवेली (haveli police station), सिंहगड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Police Station) हद्दीतून चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे (API Prakash More), पोलीस उपनिरीक्षक वैशाली भोसले (PSI Vaishali Bhosle),
यशवंत आंब्रे, नामदेव रेणुसे, गजानन सोनुने, चेतन गोरे, निखील जाधव यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | pune police crime branch unit-2 arrest criminal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stock | सप्टेंबरमध्ये 100 टक्क्यांपर्यंत रिटर्न देणारे ‘हे’ Top-5 स्टॉक्स, जाणून घ्या तुमच्याकडे आहेत का हे शेयर?

Aurangabad News | स्वत:ची किडनी देऊन आईने वाचवले मुलाचे प्राण, रक्तगट वेगळा असूनही केली किडनी दान अन्…

Pune Crime | नशा करण्यासाठी पैसे न देणार्‍या 56 वर्षीय आजीवर नातवाकडून चाकू हल्ला, पुण्यातील घटना