Pune Crime | राजस्थानातील अनेक गावात ‘सेक्सटॉर्शन’चा झालाय धंदा, पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉल (Video Call) करुन नग्न (Naked) व्हायला लावणे, अश्लील बोलायला उद्युक्त करुन आणि त्यानंतर सोशल मीडिया (Social Media) आणि कुटुंबाला हे पाठवून खंडणी (Ransom) उकळ्याचा गोरख धंदा सध्या राजस्थानमधील (Rajasthan) अनेक गावात सुरु आहे. परंतु स्थानिक पोलिसांकडून (Local Police) सहकार्य मिळत नसल्याने या टोळ्यांना पकडण्यात अपयश येत आहे. व्हिडीओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडण्यासारखे अनेक प्रकार पुणे (Pune Crime) आणि राज्यात घडत आहे. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर पुणे पोलिसांची (Pune Police) पथके राजस्थान मध्ये गेल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

 

पुणे सायबर पोलीस ठाण्याचे (Pune Cyber Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके (Senior Police Inspector D.S. Hake) यांनी सांगितले की, सेक्सटॉर्शनच्या (Sextortion) तक्रारी वाढल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान राजस्थानमधील काही गावांची नावे समोर आली. त्यामुळे पुणे पोलिसांचे एक पथक तिकडे गेले होते. त्यावेळी जमतारामध्ये (Jamtara) जशी बेरोजगार तरुण-तरुणी बँक फ्रॉडच्या (Bank Fraud) गुन्ह्यात फसवणूक (Fraud) करतात. याच पद्धतीने या काही गावामधील तरुण-तरुणी सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आले आहे. हा याठिकाणच्या काहींचा उद्योग झाला आहे. यामधून मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असल्याने स्थानिक लोकांचा या तरुण-तरुणींना पाठिंबा मिळत आहे.

पुणे पोलिसांप्रमाणे इतर राज्यातील पोलीस (State Police) पथके या ठिकाणी तपासासाठी येऊन गेली होती. स्थानिक नागरिकांचा असहकार, स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने त्याठिकाणी आरोपींचा शोध घेणे अवघड होते. तसेच अनेक तक्रारदार अगोदर तक्रार देतात आणि नंतर त्यांचा त्रास बंद झाल्यानंतर ते प्रत्यक्षात फिर्याद देत नसल्याने सायबर चोरट्यांचे (Cyber Thieve) फावते.

 

मुलीच्या आवाजात बोलून संपर्क वाढविला
पुण्यातील एका तरुणाला एका तरुणीने व्हिडिओ कॉल केला. त्याच्यासोबत बोलून संपर्क वाढवला. आपण प्रेमात पडल्याचे भासवून त्याला कपडे उतरवण्यास भाग पाडले. यानंतर या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग करुन या टोळीने तरुणाकडे खंडणी मागण्यासाठी फोन करायला सुरुवात केली. या तरुणाला हा व्हिडिओ मित्रांच्या सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी (Threat) दिली.

 

जवळच्या लोकांची माहिती गोळा करतात
ही टोळी एखाद्याला शिकार बनवण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या नातेवाईक, परिचितांची माहिती गोळा करते.
त्यांचे नाव घेऊन त्यांना हा व्हिडिओ पाठवू का, अशी धमकी दिली जाते.
बंगळूरुमध्ये सेक्सटॉर्शनमुळे एका एमबीएला (MBA) शिकणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.
मुंबईत एका डॉक्टरला अशाच प्रकारे त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळली.
अनेक प्रतिष्ठित, राजकीय कार्यकर्त्यांनाही अशा प्रकारे जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न अनेकवेळा झाला आहे.

गुन्ह्यासाठी मॉडेलचा वापर
मै बँक से बोल ररा हूं, आपका केवायसी अपडेट करना है, आपका बँक डिटेल्स दिजीए, असं बोलून नागरिकांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांचे क्षणार्धात त्यांचे बँक खाते रिकामे केले जाते.
या प्रकारासाठी झारखंडमधील जमतारा हे गाव देशभरात कुख्यात बनले, ते सायबर गुन्ह्यामुळे (Cyber Crime). जमतारा ही सत्य घटनेवर एक वेबसीरिज आली होती.
असाच प्रकार पुणे सायबर पोलिसांना राजस्थानमधील सीमेवरील काही गावात आढळून आला आहे.

 

जमतारा जसे बँक फ्रॉडमध्ये गाजले, तसा प्रकार या गावामधून सेक्सटॉर्शनचा सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर होत आहे.
पुणे पोलीस पथक जमतारा येथे तपासण्यासाठी गेले असता, त्यांना दगडफेकीला सामोरे जावे लागले होते.
राजस्थानमधील या सीमावर्ती गावामध्ये गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकाला अनेक अडचणींशी सामना करावा लागला होता.

 

Web Title :- Pune Crime | Pune police expose sextortion rackets being run in Rajasthan

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा