Pune Crime | वडकी येथे घरावर दरोडा ! मदतीला येऊ नये म्हणून शेजार्‍यांच्या घराला बाहेरुन घातल्या कड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  Pune Crime | लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरातील वडकी गावातील एका घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला असून कोणी मदतीला येऊ नये, म्हणून शेजारी राहणार्‍यांचे दरवाजे बाहेरुन बंद करुन त्यांना कोंडल्याचे समोर (Pune Crime) आले आहे.

याप्रकरणी सुभाष संभाजी मोडक (वय ५५, रा. वडकी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, वडकी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात Loni Kalbhor Police Station (गु. र. नं. ५३८/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन लोणी काळभोर पोलिसांनी २० ते २५ वयाच्या ५ चोरट्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुभाष मोडक हे घरी झोपले असताना मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पाच जण जबरदस्तीने त्यांच्या घरात शिरले. चोरट्यांना पाहून त्यांची पत्नी ओरडली. चोरट्यांनी कोयता व काठीचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली. २५ ग्रॅम सोने, रोख रक्कम, मोबाईल फोन, २ एल ईडी लाईटस व तेलाच्या बाटल्या असा ६१ हजार ५०० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरुन (Pune Crime) नेला. मोडक यांच्या मदतीला कोणी येऊ नये, म्हणून चोरट्यांनी अगोदर शेजारी राहणार्‍यांचे दरवाजे बाहेरुन बंद करुन त्यांना कोंडले होते. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बिडवे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | robbery at Wadaki ! The outside of the neighbor’s house was locked so that help would not come

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Govt. Part Time Employees | सरकारच्या अंशकालीन (पार्ट टाईम) कर्मचाऱ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या

Shakti Mohan | एकेकाळी IAS बनण्याचं स्वप्न होतं DID विजेत्या ‘शक्ती मोहन’चं; 36 व्या वर्षी देखील या गोष्टी फॉलो करून रहाते ‘टकाटक’ अन् ‘फिट’

Rakesh Jhunjhunwala यांनी 3 दिवसात ‘या’ शेयरमध्ये कमावले 310 कोटी रुपये, तुम्ही सुद्धा केली आहे का गुंतवणूक?