Pune Crime | चंदन चोर ‘पुष्पा’चा पत्नीच्या अटकपूर्व जामीन मंजूर; ‘पुष्पा’चा जमीन न्यायालयाने फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एनडी.ए खडकवासला येथील अति-संरक्षित क्षेत्रात घुसून चंदनाच्या झाडाची चोरी केल्याप्रकरणी पुष्पाच्या पत्नीला अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) न्यायालयाने मंजूर केला (Pune Shivajinagar Court). तर ‘पुष्पा’चा जमीन न्यायालयाने फेटाळला. (Pune Crime)

 

पत्नी उषा करडे याना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. दोन्ही आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी दिले आहेत.
रमेश करडे असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. त्याची पत्नी उषा हिला अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
तिने अ‍ॅड. राकेश सोनार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. ती सहआरोपी आहे.
तिच्याकडून वजनाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यामध्ये पुष्पाची पत्नी उषा यांचा कोणताही सहभाग नव्हता, आत्तापर्यंत तिने गुन्हात पूर्ण सहकार्य केले असून. तिला अटक करण्याची गरज नसल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. राकेश सोनार (Adv Rakesh Sonar) यांनी केला. 6 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेबाबत भगवान दारवटकर यांनी उत्तमनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. रात्री 10 सकाळी 7 या दरम्यान 85 किलो वजनाचे 6 ते 8 फुट चंदनाच्या झाडाचे चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. (Pune Crime)

 

सदर प्रकरणात अ‍ॅड. राकेश सोनार याना, अ‍ॅड. सुदर्शन खाडे, अ‍ॅड. महेश देशमुख, व अ‍ॅड. वैभवी वंडकर आणि अ‍ॅड. चेतन शिरुडे यांनी सहकार्य केले.