Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात रिक्षाचालकाचा 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; भाडे देण्यास पैसे नसल्याचा घेतला गैरफायदा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हडपसर (Hadapsar) येथून रिक्षाने जात असताना भाडे देण्यास पैसे नसल्याचा गैरफायदा घेऊन एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीला झाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच दोघा जणांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग (molestation case ) केल्याचा उघड झाले आहे. (Pune Crime)

सागर विभीषण बचुटे (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. तसेच विकीकुमार फुली पासवान (वय २३, रा. कामठे वस्ती, फुरसुुंगी), अशोक वीरबहादुर थाप्पा (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्या अन्य दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व तिची मैत्रीण हे ५ जानेवारी रोजी रिक्षाने बुधवार पेठेत जात होते.
त्यांच्याकडे रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा सागर बचुटे याने तिला रेसकोर्स (race course road pune) समोरील झाडीमध्ये नेऊन फिर्यादीवर बलात्कार केला.

तसेच डिसेंबर महिन्यात फुरसुंगी येथे फिर्यादी रहात असताना विकी पासवान व अशोक थाप्पा यांनी त्यांच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
हडपसर पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पोलीस निरीक्षक डगळे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking 16 year old girl raped by autorickshaw driver in Pune The disadvantage of not having the money to pay the rent

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NEET-PG OBC Reservations | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ! वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी; EWS 10 टक्के आरक्षणालाही ग्रीन सिग्नल

 

Pune Crime | सावधान ! अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यास खावी लागेल जेलची हवा; पुण्यात अल्पवयीन मुलांचे व्हिडीओ Facebook वर पोस्ट करणार्‍याला अटक

 

Pune Crime | कोल्हापूरच्या 26 वर्षीय तरुणीला अश्लिल मेसेज ! खडकी पोलिसांकडून वाकडमधील जीम ट्रेनर गजाआड