Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात तोतया डॉक्टर करायचा ‘हेअर ट्रान्सप्लांट’; विमाननगर परिसरातील 2 महिलांसह तिघांचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोणतीही पदवी नसताना नागरिकांना वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे सांगून हेअर ट्रान्सप्लांट (hair transplant in pune) करुन फसवणूक (Cheating) करणार्‍या तोतया डॉक्टराला (Fake Doctor) विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) अटक (Pune Crime) केली आहे.

 

शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह Shah Rukh alias Sameer Haider Shah (वय २४, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) असे या तोतया डॉक्टराचे नाव आहे. त्याचबरोबर केवळ दहावी पास असताना परिचारिका म्हणून त्याच्या क्लिनिकमध्ये काम करणार्‍या अन्य दोन महिलांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

याप्रकरणी महापालिकेच्या (Pune Corporation) ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील (pmc dhole patil road regional office) विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे (Dr. Rekha Galande) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात असलेल्या डॉ. हेअर मॅजिका हेअर ट्रान्सप्लांट अँड अ‍ॅस्थेटिक स्टुडिओ (Dr. Hairmagica Hair Transplant & Aesthetic Studio In Pune) येथे कारवाई करुन डॉक्टरला अटक (Doctor Arrested in Pune) केली आहे.

शाहरुख शाह याने गेल्या ३ वर्षांपासून हे हेअर ट्रान्सप्लांट क्लिनीक (Hair Transplant Clinic In Pune) सुरु केले होते.
तो हेअर ट्रान्सप्लांटसाठी (Hair Transplant) प्रत्येकाकडून २५ ते ३० हजार रुपये घेत असे.
त्याच्याविषयी तक्रारी आल्यानंतर महापालिकेकडून (PMC News) त्याची चौकशी करण्यात आली.
त्यावेळी त्याने केवळ बीएस्सी पर्यंत शिक्षण घेतले असल्याची माहिती पुढे आली.
त्याच्याकडे हेअर ट्रान्सप्लांट विषयी कोणतीही पदवी नसल्याने आढळून आल्याने महापालिकेने त्याच्यावर कारवाई (PMC Action) केली आहे.
त्याने क्लिनिकमध्ये ठेवलेल्या दोन महिलांना परिचारिकेचे कोणतेही शिक्षण नसताना त्यांच्याकडून परिचारिका म्हणून काम करुन घेतले जात (Pune Crime) होते.
सहायक पोलीस निरीक्षक क्षीरसागर अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking ! Fake Doctor Shah Rukh alias Sameer Haider Shah done Hair transplant in Pune; Three including 2 women from Vimannagar area exposed FIR in Viman Nagar Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Corporator Avinash Bagwe | पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द; कोर्टाकडून ‘त्या’साठी 6 आठवड्यांची मुदत

Devendra Fadnavis | होय ! आम्ही हिंदुत्त्ववादी, सावरकरवादी आहोत, फडणवीसांचा शिवसेनेवर टीकेचा ‘बाण’ (व्हिडिओ)

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 915 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी