Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार; इंदापूर तालुक्यातील घटना

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मागेल तेवढे पैसे देत नाही आणि जमिनीचे वाटप करत नसल्याच्या कारणावरून मुलाने आपल्या आई वडिलांवर सशस्त्र हल्ला (Attempt To Murder) केल्याची घटना घडली. ही घटना इंदापूर तालुक्यातील (Indapur News) काझड येथे रविवारी दुपारी घडली असून या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू (Murder in Pune) झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटमुळे परिसरात खळबळ (Pune Crime) उडाली आहे.

अलका पांडुरंग नरुटे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे तर वडिल पांडुरंग बाबुराव नरुटे (वय ६०) हे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा अमित पांडुरंग नरुटे (वय ३१) याच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात (Walchand Nagar Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काझड येथे रविवारी दुपारी पांडुरंग नरुटे आणि मुलगा अमित यांच्यामध्ये मागेल तेवढे पैसे देत नाही, जमीन वाटू देत नाही या कारणावरून वादावादी झाली. हा वाद इतका टोकाला गेला की, अमितने आपल्या वडिलांना लथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर कोयत्याने ही वार केले. यामध्ये पांडुरंग नरुटे यांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटून पडला. ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर अमितने आई अलका यांच्यावरही कोयत्याने हल्ला केला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. भर दिवसा घडलेल्या या घटमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अमित विरोधात पोलिसांत गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एन लातूरे (API B.N. Lature) करत आहेत.

Web Title :Pune Crime | Son attempt to murder of mother and father,
mother died on spot, incident happens in indapur taluka of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalna Crime | विवाहितेची 4 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या; जालना जिल्ह्यातील घटना

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Punit Balan Group | पहिली ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदसाठी लढत!

 

LPG Cylinder Price | नवीन वर्षात मोठी भेट ! थेट 100 रुपये स्वस्त झाला कमर्शियल LPG सिलेंडर, घरगुती सिलेंडरमध्ये बदल झाला का?, जाणून घ्या