Pune Crime | पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई, 66 लाखांची विदेशी दारु जप्त

नीरा/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | राज्य उत्पादन शुल्क पथकाने (State Excise Squad) पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई केली असून या कारवाईत तब्बल 66 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त (Foreign Liquor Seized) केला आहे. ही कारवाई पुरंदर तालुक्यातील (Purandar Taluka) नीरा (Nira) येथे करण्यात आली. यामध्ये 66 लाख रुपयांची तस्करी (Smuggling) करण्यात येत असलेली दारु सह एकूण 91 लाख 77 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.15) राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक यांना माहिती मिळाली की, पुरंदर तालुक्यातील नीरा गावाच्या हद्दीत नीरा-लोणंद रोडवर (Nira-Lonand Road) हॉटेल न्यू प्रसन्ना समोरील रोडवर गोवा (Goa) राज्यात विक्री असलेल्या मद्याची वाहतूक होणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे नीरा गावच्या परिसरातील हॉटेल न्यू प्रसन्न समोरील रोडवर राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक दोन पुणे विभागाने (Pune Division State Excise Squad Two) सापळा रचला.(Pune Crime)

 

अधीक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार भारत बेंज कंपनीचा ट्रक त्यांना दिसला. या ट्रक चालकाला ट्रक रोडच्या कडेला घेण्याचा इशारा केला.
त्यानंतर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा व बिअरचा साठा मिळाला.
ट्रक चालक (Truck Driver) प्रवीण परमेश्वर पवार Praveen Parmeshwar Pawar
(वय-23 रा. तांबोळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | state excise squads major operation at neera in purandar pune 91 lakh worth of foreign liquor seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 2 लाखाची लाच मागणारा सहायक पोलीस निरीक्षक अँटी कप्शनच्या जाळ्यात

 

APY | मिळेल 5000 रूपये पेन्शन, जर 40 व्या वर्षी असे कराल प्लॅनिंग, जाणून घ्या सरकारी स्कीमच्या डिटेल्स

 

Pune PMC News | पालखी सोहळ्यातील ज्येष्ठ वारकर्‍यांना कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस ! महापालिकेने 20 ठिकाणी केली औषधोपचाराची सुविधा