×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पुण्यात MPSC ची तयारी करणार्‍या अन् मुळच्या सांगलीच्या विद्यार्थ्याची...

Pune Crime | पुण्यात MPSC ची तयारी करणार्‍या अन् मुळच्या सांगलीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; भाऊ पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात पोलिस उपनिरीक्षक (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील नवी पेठेच्या (Navi Peth, Pune) विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे राहणार्‍या अमर रामचंद्र मोहिते Amar Ramchandra Mohite (33, रा. नवी पेठ, विठ्ठल मंदिराच्या मागे. मुळ गाव – तासगाव, सांगली) याने विषारी औषध प्राशन (Poison) करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. अमर यांचे भाऊ दत्तात्रय रामचंद्र मोहिते (PSI Dattatry Ramchandra Mohite) हे पिंपरी-चिंचवड पोलिस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयाच्या हद्दीतील भोसरी पोलिस ठाण्यात (Bhosari Police Station) पोलिस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) म्हणून कार्यरत आहेत. (Pune Crime)

 

 

 

पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय मोहिते यांना भाऊ अमर बाबत काही तरी माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या एका मित्राला आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात (Vishrambaug Police Station) माहिती दिली. विश्रामबाग पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, अमरने खोलीचे दार बंद केले होते. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तो झोपलेल्या अवस्थेत आढळून आला (Pune Crime). त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्यानंतर रूग्णवाहिका बोलाविण्यात आली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) कुंडलिक कायगुडे Police inspector (Crime) Kundlik Kaigude यांनी आणि इतरांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

 

आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मात्र, कौटुंबिक कारणामुळं अमर मोहितेनं आत्महत्या केल्याचं बोललं जातंय.

 

Web Title :- Pune Crime | Suicide of a native Sangli student preparing for MPSC in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sundar Pichai Google | काय सांगता ! होय, ‘गुगल’ला खुपच आवडलं भाड्याचं ऑफिस, आता 7400 कोटींना ‘खरेदी’…

Dapoli Crime News | दापोली तालुक्यात तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू, घातपाताचा संशय; गावात उडाली खळबळ

Multibagger Super Stocks | ‘या’ आठवड्यातील स्टॉक – एकाने 90% रिटर्न्स दिला तर बाकीचे 50% पेक्षा जास्त पुढे

Must Read
Related News