Dapoli Crime News | दापोली तालुक्यात तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू, घातपाताचा संशय; गावात उडाली खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Dapoli Crime News | वणोशी (ता. दापोली) गावातील खोतवाडी येथे एकाच घरात तीन वृद्ध महिलांचा (Old Woman) जळून मृत्यू झाल्याची घटना उघकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. सत्यवती पाटणे (वय ७५), पार्वती पाटणे (वय ९०), इंदुबाई पाटणे (वय ८५) अशी मृत वृद्ध महिलांची नावे आहेत. (Dapoli Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पालगड रोडवरील वणोशी गावात असलेल्या खोतवाडीत सुमारे २५ घरे आहेत. येथील लोक काम धंद्यानिमित्त मुंबईला असल्याने बहुतांश घरे बंद आहेत. गावात केवळ चार-पाच कुटुंबेच वास्तव्य करत आहेत.
त्याती एका घरात सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे राहत होत्या तर त्यांच्या घरासमोर नातेवाईक असलेल्या इंदुबाई पाटणे राहत होत्या.
थंडीच्या दिवसांमुळे या दोन्ही घराचे दरवाजे आणि खिडक्या लवकर बंद होत होत्या. मात्र, रोज सकाळी या तीन ही महिला उन्हात बसत असत. शिवाय घरासमोरील मंदिरात नित्यनियमाने पूजाअर्चा करत होत्या. त्यामुळे विनायक पाटणे यांनी ही मंदिराच्या दरवाजाची चावी त्यांच्याकडे च दिली होती.

शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे पाटणे मंदिरात पुजासाठी आले असता त्यांना या महिला उन्हाळ बसलेल्या दिसल्या नाहीत.
शिवाय मंदिराच्या कुलूपाची चावी हवी असल्याने ते या महिलांच्या घरामध्ये गेले. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर त्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा ढकलून पाहिला असता तो त्यांना उघडा दिसला.
आतमध्ये त्यांनी पाहिले असता त्यांना या वृद्ध महिला मृतावस्थेत आढळून आल्या. (Dapoli Crime News)

विनायक पाटणे यांनी ही घटना ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना ही खबर दिली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घरामध्ये तीन खोल्यांमध्ये तीन महिला मृतावस्थेत आढळून आल्या. संबंधितांच्या नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली. तेही शुक्रवारी सायंकाळपर्यंत दाखल झाले. पार्वती पाटणे या अनेक वर्ष एकाच जागेवर असल्याने त्या दुसऱ्या खोलीमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळल्या. तर समोरच्या घरात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईक इंदुबाई पाटणे व सत्यवती पाटणे घरातील हॉलमध्ये मृताव्यवस्थेत आढळल्या. खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडला होता. घटनास्थळी अनेक संशयास्पद गोष्टी मिळून आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी घातपाताचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title : Dapoli Crime News | three old women burnt to death in dapoli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे,
‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये;
सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Supreme Court On Bride Jewellery | सुप्रीम कोर्ट ! सुरक्षेसाठी वधुचे दागिने आपल्या जवळ ठेवणे क्रुरता नाही

Pune Corporation | पुणे महापालिका हद्दीतील बांधकामे सरसकट नियमित होणार नाहीत, मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागणार