Pune Crime | Tinder App वर ओळख ! मुंबईत ‘ताज’ मध्ये नेऊन 23 वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात राजेश सायनीविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महिला अत्याचाराची (Crime Against Woman) एक धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. पुण्यातील एका 23 वर्षीय तरुणीवर मुंबईत (Mumbai) फिरायला नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape Case) केला. सगळ्यात गंभीर म्हणजे ऑनलाईन Tinder App वर पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) आयपीसी IPC 376 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी (Pune Police) रावेत येथे राहणाऱ्या 50 वर्षाच्या राजेश सायनी (Rajesh Saini) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत कर्वेनगर (Karve Nagar) येथे राहणाऱ्या 23 वर्षाच्या तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या दरम्यान घडला आहे.
पीडित तरुणीने बुधवारी (दि.27) फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी राजेश सायनी विरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार (PSI Meera Kavatikwar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी सायनी यांची टिंडर अ‍ॅपवर ओळख झाली.
आरोपीने फिर्यादीला घटस्फोटीत (Divorced) असल्याचे खोटे सांगून आयुष्यभर तुझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) राहण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर तिला मुंबई येथे फिरायला घेऊन गेला.
मुंबईत ताज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये (Hotel Taj Mumbai) घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध (Physical Relation) प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | The girl was introduced on Tinder App 23 year old girl assaulted at Taj hotel in Mumbai crime against Rajesh Saini at Punes Deccan police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा