Pune Crime | पुण्यात निवृत्त पोलीस महासंचालकांच्या बहिणीच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निवृत्त पोलीस महासंचालक अजित पारसनीस (Retired DGP Ajit Parasnis ) यांच्या पुण्यातील (Pune Crime) बहिणीच्या घरात चोरी (Burglary) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (दि.6) सायंकाळी पुण्यातील (Pune Crime) प्रभात रस्ता (Prabhat Road) परिसरात घडली. चोरट्यांनी तळमजल्यावर असलेल्या घराच्या खिडकीचे गज कापून घरातील दागिने (Jewelry) चोरुन नेले.

उज्वला वसंत पारसनीस Ujwala Vasant Parsnis (वय-63 रा. अभिमान अपार्टमेंट, पाचवी गल्ली, प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. उज्वला पारसनीस या घरात एकट्या राहतात. गुरुवारी सायंकाळी त्या एका कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या होत्या. रात्री घरी परत अल्यानंतर घराच्या खिडकीचे गज कापल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी रुममधील एक लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले. (Pune Crime)

घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे (Senior Police Inspector Muralidhar Karpe) यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

Web Title : Pune Crime | theft in Retired Director General of Police Ajit Parsnis’s sister’s house in Pune prabhat road

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे