Pune Crime | कॉपी राईटच्या कारवाईची धमकी ! दरमहा 15 हजार प्रमाणे उकळली 2.75 लाखाची खंडणी, मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ब्रॅण्डेड कपड्यांच्या (Branded Clothes) कंपनीचे ओरीजनल प्रोडक्ट न विकता फर्स्ट कॉपी (First Copy Sell) विकत असल्याने कारवाईची धमकी देऊन एक जण दुकानदाराकडून गेली ४ वर्षे दरमहा १५ हजार रुपये खंडणी (Ransom) उकळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी महमंद वाडी (Mohammed Wadi) येथील एका ३२ वर्षाच्या व्यापार्‍याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन मोतीराम गणात्रा Chetan Motiram Ganatra (वय ४६, रा. प्राधिकरण, निगडी Nigdi Pradhikaran Pune ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे (Pune Crime). हा प्रकार धनगंगा बिझनेस सेंटरमध्ये (Dhanganga Business Centre) २ जुलै २०१८ ते १२ मे २०२२ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे धनगंगा बिझनेस सेंटरमध्ये कपड्यांचे दुकान आहे (Cloth Shop In Dhanganga Business Centre). चेतन गणात्रा हा त्यांच्या दुकानात आला. तुम्ही ब्रॅण्डेड कपड्यांच्या कंपनीचे ओरीजनल प्रोडक्ट नसून ते फर्स्ट कॉपी असल्याचे सांगितले. तसेच आर डी बी प्रोफेशनल सर्व्हिसेस यांची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दाखविली. कारवाई करण्याची भिती दाखवून फिर्यादी यांच्याकडून प्रति महिना १५ हजार रुपयांचा हप्ता देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे त्याने दर महा १५ हजार रुपये प्रमाणे आतापर्यंत १ लाख ९५ हजार रुपये घेतले व बँक खात्यावर ७० हजार रुपये असे एकूण २ लाख ६५ हजार रुपये खंडणी स्वरुपात स्वीकारले. अजूनही तो दर महा १५ हजार रुपये खंडणीची मागणी करत होता, म्हणून गुन्हा दाखल (Extortion Case) करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Threats of Copyright Action! Ransom of Rs 2.75 lakh , crime register on Chetan Motiram Ganatra at Marketyard police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त