Pune Crime | Thergaon Queen सोबत अश्लील व्हिडिओ बनवणारा ‘कुणाल’ गजाआड; पोलिसांनी खाक्या दाखवताच मागितली माफी अन्…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | इन्टाग्रामवर अश्लील भाषा व शब्द वापरुन तयार केलेले व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या स्वयंघोषीत थेरगाव क्वीनसह (Thergaon Queen) तिघांवर वाकड पोलिसांनी (Wakad police) गुन्हा दाखल करुन दोन जणांना अटक (Arrest) केली आहे. या गुन्ह्यात फरार असलेल्या कुणाल कांबळे (रा. गणेश पेठ) याला पोलिसांनी अटक (Pune Crime) केली आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने माफी मागण्यास सुरुवात केली. तसेच यापुढे अशी चूक करणार नसल्याचा माफीनामा लिहून दिला.

 

या गुन्ह्यातील तथाकथित थेरगाव क्वीन साक्षी हेमंत श्रीश्रीमाळ Sakshi Hemant Sri Srimal (वय-18 रा. मातोश्री बिल्डींग, तीसरा मजला, पवार नगर थेरगांव, पुणे), साक्षी राकेश कश्यप Sakshi Rakesh Kashyap (रा. लिंकरोड, चिंचवड) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

 

आरोपींनी इन्स्टाग्रामवर Thergaon QueenN या नावाने अकाउंट चालणारी मुलगी साक्षी श्रीश्रीमळ हिने सोबत असणारा मुलगा कुणाल आणि एक मुलगी साक्षी कश्यप यांच्यासोबत मिळून सार्वजनिक ठिकाणी (Public Place) अश्लील भाषा (Pornographic Language) व धमकीचे व्हिडीओ (Threatening) बनवले. ते व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यातील (Wakad police station) पोलीस उपनिरीक्षक संगिता जिजाभाऊ गोडे (PSI Sangita Jijabhau Gode) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. (Pune Crime)

दरम्यान, अटक केलेल्या थेरगाव क्विन साक्षी श्रीश्रीमाळ हिने आपल्याला पश्चाताप होत असून गुन्ह्याचे गांभीर्य माहित नसल्याची कबुली दिली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे 2 रामचंद्र घाडगे (Police Inspector Ramchandra Ghadge) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | wakad police arrested kunal kamble for making threatening and pornographic videos with Thergaon Queen

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा