Pune Crime | पॉर्न वेबसाईटवरील अश्लील व्हिडिओ पाठवून पत्नीने बिघडवले मानसिक स्वास्थ्य, सॉफ्टवेअर इंजीनियर पतीचा दावा; पत्नीवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तो सॉफ्टवेअर इंजीनियर (Software Engineer) असून त्याचे पत्नीबरोबर पटत नव्हते. दोघे पुण्यात वेगळे रहात होते. त्यावेळी पत्नीने मानसिक त्रास देण्याच्या हेतूने ईमेलवर पॉर्न वेबसाईटच्या (Porn Website) अश्लील व्हिडिओ (Pornographic Videos) पाठवून आपली मनस्थिती (Pune Crime) खराब केली. त्यामुळे आपले व आपल्या कुटुंबियांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत झाल्याचा दावा पतीने पोलिसांकडे (Pune Police) केलेल्या तक्रारीत केला आहे.

 

याप्रकरणी वारजे येथे राहणार्‍या एका 33 वर्षाच्या तरुणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन सध्या धुळे (Dhule) येथे राहणार्‍या त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा मुळचा धुळ्यातील असून सध्या वारजे माळवाडी येथे राहत आहे. तो बंगलुरु येथील कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असून वर्क फॉर्म होम (Work From Home) करीत आहेत. त्याचे धुळ्यातील प्रियंका हिच्याशी 2018 मध्ये लग्न झाले. लग्न झाल्यानंतर ते मुंबईत राहण्यास गेले. प्रियंकाला सुरुवातीपासून घरातील गोष्टी सहन होत नसायच्या. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद होत. प्रियंका ही त्याला मेसेजवर तिला घटस्फोट (Divorce) पाहिजे असे म्हणून लागली. तिला नातेवाईकांनी समजावून सांगितले. तरी देखील तिच्यात काही एक बदल झाला नाही. त्यामुळे थोडे दिवस तिला माहेरी पाठविले.

त्यानंतर ती पुण्यात एकटीच राहायला आली होती. त्यावेळी फिर्यादी यांनी तिला भेटून आपल्याबरोबर रहाण्यास बोलविले. तेव्हा मला 7-8 महिन्याचा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा कोर्स (Software Development Course) करायचा आहे, तु मला डिस्ट्रब करु नको, मी तुझ्यासोबत राहणार नाही, मला घटस्फोट हवा आहे, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांनी पत्नीविरुद्ध कौटुंबिक न्यायालयात (Family Court) घटस्फोटासाठी 2019 मध्ये अर्ज केला. तिने फिर्यादीविरुद्ध धुळे न्यायालयात पोटगीसाठी व कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.

 

ही सर्व प्रकरणे प्रलंबित असताना प्रियंका हिने 18 फेब्रुवारी 2019 ते 28 मार्च 2021 दरम्यान आपल्या ई मेल आयडीवरून फिर्यादी
याच्या ईमेल आयडीवर पॉर्न वेबसाईटच्या अश्लील व्हिडिओ पाठवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला.
यामुळे फिर्यादी यांची मनस्थिती खराब केल्यामुळे त्याचे व त्याच्या कुटुंबाचे मानसिक, शारीरिक, आर्थिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत झालेली आहे.
तसेच तिने आपल्याशिवाय इतरांनाही असे अश्लिल व्हिडिओ पाठविले असावेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी आय टी अ‍ॅक्ट (IT Act)नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Wife damaged mental health by sending obscene videos on porn website, claims software engineer husband; FIR against wife

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Madras High Court | पत्नीने मंगळसूत्र काढणं ही सर्वोच्च पातळीवरील मानसिक क्रूरता; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

 

CM Eknath Shinde | ‘आता आपलं सरकार, शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही’ – एकनाथ शिंदे

 

Maharashtra Petrol-Diesel Price | दिलासा ! राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट; जाणून घ्या आपल्या शहरांतील नवे दर