Pune Crime | कोथरुड, हडपसरमधील 4 सराफांना महिलेने घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हडपसर आणि कोथरुडमधील दोन सराफांच्या चार दुकानात खरेदीच्या बहाण्याने एका महिलेने सोन्यांच्या अंगठ्या नजर चुकवून चोरून नेल्या़ विशेष म्हणजे या महिलेने दोन सराफांच्या कोथरुड (Kothrud) आणि हडपसर (Hadapsar) येथील प्रत्येक दोन दुकानात ही चोरी केली असून तिने चारही ठिकाणाहून सोन्याच्या अंगठ्या लांबविल्या (Pune Crime) आहेत.

 

कोथरुड व हडपसर येथील पी एन गाडगीळ ज्वेलरी (png jewellers pune) आणि चंदूकाका सराफ (chandukaka saraf) या दोन सराफी दुकानात या चोर्‍या केल्या. हडपसर येथील दोन दुकानातून प्रत्येकी एक एक ग्रॅम सोन्याची अंगठी महिलेने हातचलाखी करुन चोरुन नेली. हडपसर येथील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स या दुकानातून ७़५ ग्रॅम वजनाची ३९ हजार ५७८ रुपयांची अंगठी तसेच चंदुकाका सराफ अँड सन्स या मगनपट्टा येथील दुकानातून ९़५ ग्रॅमची ५१ हजार ६८५ रुपयांची सोन्याची अंगठी महिलेने हातचलाखी करुन चोरुन नेली. या चारही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. CCTV फुटेजवरुन या महिलेने चोरी (Pune Crime) केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

Web Title :- Pune Crime | woman cheated with 4 Sarafs in Kothrud, Hadapsar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai School Reopen | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय ! ‘मुंबईत उद्यापासून शाळा सुरु होणार नाहीत, तर…’

Omicron Variant | पुणेकरांची चिंता वाढली ! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीमध्ये ‘कोरोना’ची लक्षणं, रिपोर्टची प्रतीक्षा

Parambir Singh | परमबीर सिंह आणखी गोत्यात ! माजी पोलिस आयुक्त सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीवर गृहमंत्रालयाकडून चौकशीचे आदेश