Pune Crime | किराणा दुकानदारांशी महिलेची बनवाबनवी ! इतर सामानाबरोबर पैसे देण्याचा बहाणा करुन फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | किराणा दुकानात येऊन महिलेने सामानाची यादी दिली. हे सामान तुम्ही बांधून ठेवा, मी दुसर्‍या दिवशी येऊन पैसे देऊन सामान नेते, असे सांगून तिने ५ तेलाच्या पिशव्या घेतल्या व ती निघून गेली. मात्र, दुसर्‍या दिवशी ती आलीच नाही. किराणा दुकानदाराने फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यावर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हा या महिलेने अशाच प्रकारे आणखी काही दुकानदारांची फसवणूक केल्याचे उघड झाले. (Pune Crime)

 

याप्रकरणी पिराजी बाजीराव डफळ (वय ५८, रा. वडगाव शेरी – Wadgaon Sheri) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ जून रोजी रात्री दहा वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे खराडीमध्ये साई ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. फिर्यादी यांच्या दुकानात एक अनोळखी महिला आली. तिने मुलाचा वाढदिवस आहे, असे सांगून सामानाची यादी दिली. फिर्यादी यांच्याकडून ५ जेमिनी तेलाचे पाकिटे व त्याचे पैसे दुसर्‍या दिवशी सामानसोबत देते, असे सांगून त्या तेलाची पाकिटे घेऊन निघून गेल्या. दुसर्‍या दिवशी ही महिला सामान नेण्यासाठी आली नाही की तिने पैसेही दिले नाहीत. अशाच प्रकारे तिने चंदननगर, खराडी परिसरातील ५ ते ६ दुकानात जाऊन ६ हजार १५० रुपयांच्या ३० तेलाच्या पिशव्या घेऊन फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. गेल्या ४ ते ५ दिवसात हा प्रकार घडला आहे. चंदननगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Woman with grocery shopkeepers! Fraud under the pretext of paying with other goods

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | ‘उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचे नाव शिवसेना ऐवजी ‘शिल्लक सेना‘ करून घ्यावे’; मनसेचा खोचक टोला

 

Pune Metro | पुणेकरांसाठी खुशखबर ! लवकरच हडपसर-पुलगेट भागातही धावणार मेट्रो

 

Maharashtra Political Crisis | राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ शकते का ? 16 आमदारांचे निलंबन होऊ शकते का ? जाणून घ्या कायदेतज्ञांचं मत