Maharashtra Political Crisis | राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ शकते का ? 16 आमदारांचे निलंबन होऊ शकते का ? जाणून घ्या कायदेतज्ञांचं मत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राज्यातील शिवसेनेत (Shivsena) सुरू झालेल्या बंडखोरीचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला आहे. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेले बंड आता भाजपाच्या हालचाली वाढल्याने तीव्र झाले आहे. दरम्यान, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना निलंबन नोटीस बजावली असून त्याविरोधात एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिंदे यांनी याविरोधात दोन याचिका दाखल केल्या आहेत. या राजकीय गदारोळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का, शिवसेनेच्या 16 आमदारांचे निलंबन होऊ शकते, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Maharashtra Political Crisis)

 

राज्यात निर्माण झालेल्या या राजकीय आणि कायदेशीर मुद्द्यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बापट यांनी म्हटले की, विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. यात एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना येत्या 48 तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे. जर हे 16 आमदार 48 तासांत आले नाही तर उपसभापती या आमदारांना निलंबित करू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे.

कायदेतज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी सांगितले की, सत्र चालू झाले आणि तिथे समजा विश्वासाचा ठराव मांडला आणि तो संमत झाला तर त्याचा अर्थ उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल. मग तिथे सगळे नाटक संपते. आणि दुसरा कोणीतरी येईल. जर दुसरे कोणी तयार झाले नाही किंवा बहुमत आले नाही तर 6 महिन्यांकरिता राष्ट्रपती राजवट येते. या 6 महिन्यांमध्ये निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यावी लागते. (Maharashtra Political Crisis)

 

दरम्यान, शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याने बंडखोर आमदारांचे धाबे दणाणले आहे.
शिवसैनिकांनी बंडखोरांची कार्यालये फोडण्यास सुरूवात केली.
आता मोदी सरकारकडून (Modi Government) एकनाथ शिंदे यांच्या गटातील 15 बंडखोर आमदारांच्या घरी सुरक्षा पुरविण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांचे घर आणि कार्यालयाचा ताबा सीआरपीएफ जवानांनी घेतला आहे.
इतर 15 आमदारांच्या घरी सुद्धा CRPF चे जवान तैनात करण्यात येत आहेत.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | Can there be a presidential rule in maharashtra Can 16 MLAs be suspended Find out the opinion of experts ulhas bapats reaction

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा