Pune Crime | अभ्यासिकेत निघालेल्या तरुणीकडे पाहून अश्लील चाळे; पुण्यातील टिळक रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | स्पर्धापरीक्षेची (Competitive Exam) तयारी करणाऱ्या तरुणीचा अभ्यासिकेत जाताना एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग (Molesting Case) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. आरोपीने पँटची चेन उघडून तरुणी समोर अश्लील चाळे (Pornography) केले. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपीविरुद्ध आयपीसी कलम IPC 354, 354 (A) (D), 509 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत नवी पेठेत (Navi Peth) राहणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार 10 जानेवारी 2022 रोजी सकाळी साडे सहा ते सव्वा आठच्या सुमारास शास्त्री रोड व टिळक रोडवर (Tilak Road) घडला.
याबाबत तरुणीने उशिरा तक्रार दिली आहे.
तरुणीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते.
10 जानेवारी रोजी सकाळी ती अभ्यासिकेत जात होती. त्यावेळी शास्त्री रस्त्यावरील (Shastri Road) सॅफ्रॉन हॉटेल (Saffron Hotel) समोरून जात असताना एका अनोळखी तरुणाने पीडित तरुणीचे लक्ष वेधून घेत पँटची चेन उघडली आणि अश्लील चाळे केले.
तसेच अश्लील भाषेत बोलून तरुणीच्या मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले.
यानंतर काही अंतर तरुणीचा पाठलाग केला.
पीडित तरुणी घाबरल्यामुळे पोलिसांकडे तक्रार केली नाही.
अखेर रविवारी (दि.9) तिने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शेंडगे (PSI Shendge) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | wrong things in front of 25 years old girl who going to study Incident on Tilak Road in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा