Pune Crime | ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाला गमवावा लागला जीव; सळई पोटात घुसून जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये (Pune Crime) अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. पुणे शहरामध्ये (Pune Crime) झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातामध्ये एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. लोणीकंद (lonikand) परिसरात एका ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे (truck driver negligence) दुचाकीवरील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ट्रकमधील सळई पोटात घुसून तरुणाचा मृत्यू झाला आहे.

सागर शंकर वाघमारे Sagar Shankar Waghmare (वय-20 रा. खुळेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand police station) ट्रकचालक रमेश नंदकुमार साठे (वय-24) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक रमेश साठे हा भरधाव वेगात ट्रक घेवून अहमदनगर कडून पुण्याकडे येत होता. तर ट्रकच्या पाठिमागून सागर वाघमारे हा त्याच्या दुचाकीवरुन येत होता. महालक्ष्मी स्टीलच्या दुकानासमोर आल्यानंतर ट्रकने अचानक वळण घेतले. यावेळी पाठीमागून आलेल्या सागरच्या पोटात ट्रकमधील सळई घुसली. यात तो खाली कोसळून गंभीर जखमी झाला. यातच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

लोणीकंद येथे झालेल्या दुसऱ्या अपघातात एका कारच्या धडकेत 32 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कार चालक कान्हु तुकाराम कर्डीले Kanhu Tukaram Kardile (वय-53 रा. वडगाव शेरी) याला अटक केली आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार दिपक महाले (Deepak Mahale) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. हा अपघात गुरुवारी रात्री झाला.

सिंहगड रोड परिसरात झालेल्या तिसऱ्या अपघातामध्ये टेम्पोने धडक दिल्याने कोमल भारत अडागळे (वय-33 रा. पर्वती) यांचा मृत्यू झाला आहे.
तर त्यांचे पती भरत अडागळे (वय-38) हे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात वेताळबुवा चौकाकडून भूमकर चौकाकडे जात असताना झाला.

Web Titel :-  Pune Crime | Youth died in road accident in lonikand of pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karvy Stock | कार्वी स्टॉक ब्रोकिंगला झटका ! ED ने जप्त केले 700 कोटीचे शेयर, IndusInd व ICICI सह इतर बँकांनाही लावला 2,873 कोटींचा ‘चूना’

Khed-Shivapur Tolanaka | खेड-शिवापूर टोलनाका बंद होणार नाही – NHAI संचालकाची माहिती

Municipal Elections | मंत्री बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान, म्हणाले – ‘महापालिका 3 सदस्यीय प्रभागाचा बुधवारी फेरविचार’