Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! प्रेम प्रकरणातून तरुणाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या, 8 महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात एका 26 वर्षाच्या तरुणाने प्रेम प्रकरणातून (Love Affair) स्वत: वर गोळी झाडून (Shooting Himself) आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हडपसर परिसरात घडली आहे. डिसेंबर 2021 मध्ये या तरुणाचे लग्न झाले होते. विशाल राजेंद्र तोडकर Vishal Rajendra Todkar (रा. भागीरथीनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्यातील (Hadapsar Police Station) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात (Pune Crime) आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल याचा कपड्यांचा व्यवसाय (Clothing Business) होता. पुणे शहरामध्ये त्याची कपड्यांची दुकाने आहेत डिसेंबर 2021 मध्ये त्याचे लग्न झाले. सध्या तो हडपसर परिसरात त्याची पत्नी आणि आई सोबत वास्तव्यास होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या कारणावरुन मागील काही दिवसांपासून त्याचे घरात वाद सुरु होते. यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. पत्नी माहेरी गेल्याने विशाल नैराश्यात होता. (Pune Crime)

 

रविवारी रात्री नऊच्या सुमारास त्याने स्वत:वर गावठी पिस्तुलातून (Pistol) गोळी झाडून आत्महत्या केली.
आज सकाळी तो फोन उचलत नसल्याने कुटुंबीयांनी घरी येऊन पाहिले असता हा प्रकार उघडीकीस आला.
त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी मारुन घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
दरम्यान, विशालने गावठी पिस्टल कोणाकडून आणली. त्याबाबत त्याच्या कुटुंबाकडे व मित्रांकडे चौकशी केली जात आहे.
मात्र, याबाबत कोणालाच काही माहित नसल्याचे समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | youth suicide by shooting himself in head over love affair hadapsar pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रीमंडळ विस्तारात पुण्याला एक मंत्रीपद, चंद्रकांत पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, इतरांना संधी नाही?

 

CM Eknath Shinde | शिवसेनेच्या 2 आमदारांना लागली लॉटरी, बंडखोरीनंतर मंत्रिपद

 

Pune Crime | ७ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; चिमुरडीने युक्तीने करुन घेतली स्वत:ची सुटका