Pune Cyber Crime | बिटकॉईन प्रकरण ! माजी IPS अधिकारी रवींद्र पाटील आणि सायबर तज्ज्ञ पंकज घोडे यांच्यावरील MPID कलम रद्द; 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | बिटकॉईन (Bitcoin) या अभासी चलनात (क्रिप्टो करन्सी – Cryptocurrency) साखळी पद्धतीने गुंतवणुकीच्या (Investment) आमिषाने हजारो नागरिकांची फसवणूक (Cheating) करण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) सायबर तज्ज्ञ (Cyber Expert) आणि माजी आयपीएस अधिकारी (Ex – IPS Officer) यांच्यावर दाखल (Pune Cyber Crime) झालेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याचे (एमपीआयडी MPID) कलम रद्द केले आहे.

 

सायबर तज्ज्ञ पंकज प्रकाश घोडे Cyber Expert Pankaj Prakash Ghode (वय – 38 रा. ताडीवाला रस्ता) आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र प्रभाकर पाटील Ex – IPS Officer Ravindra Prabhakar Patil (वय – 45 रा. बिबवेवाडी)
यांनी गोपनीयतेचा भंग करुन गैरमार्गाने आरोपींच्या खात्यातील बीटकॉईन त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे. (Pune Cyber Crime)

 

विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी (Special Sessions Judge S. S. Gosavi) यांच्या न्यायालयाने आरोपींवरील एमपीआयडी कायदा रद्द ठरवत हे प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे वर्ग केले आहे.
आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे (First Class Magistrate Shraddha Dolare) यांनी 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?
फसवणूक प्रकरणातील आरोपी अमित भारद्वाज (Amit Bhardwaj) व विवेककुमार भारद्वाज (Vivek Kumar Bhardwaj) या दोघा भावांनी पुण्यासह देशभरातील सुमारे साडेचारशे लोकांची बिटकॉईनमध्ये फसवणूक केली होती.
जगभर गाजलेल्या या प्रकरणात पहिला गुन्हा दत्तवाडी (Dattawadi Police Station) व निगडीमध्ये (Nigdi Police Station) दाखल झाला होता.
पुणे पोलिसांनी (Pune Police) त्यात दोघांना अटक केल्यानंतर देशभरात त्यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात एकूण 17 जणांना अटक केली होती.
बिटकॉईनबाबत (Cryptocurrency) फारशी माहिती नसल्याने पोलिसांनी सायबर तज्ञ (Cyber Expert) पंकज प्रकाश घोडे व तत्कालीन आयपीएस अधिकारी रविंद्र प्रभाकर पाटील यांची मदत घेतली.
पण, पोलिसांनी विश्वासाने दिलेल्या तांत्रिक माहितीचा दुरोपयोग (Missuse) करुन या मार्गदर्शकांनीच पोलिसांची फसवणूक (Fraud Case) केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Cyber ​​Crime | Bitcoin case MPID clause against former IPS officer Ravindra Patil and cyber expert Prakash Ghode canceled Police custody until March 25

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा