Pune Cyber Crime : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं 42 वर्षीय महिलेला अडीच लाखाचा गंडा

पुणे (Pune Cyber Crime) : पोलीसनामा ऑनलाइन – सतत बँक, पोलीस व प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून बँक खात्याची कसलीच माहिती देऊ नये असे बजावत असतानाही सायबर (Pune Cyber Crime) चोरट्यानी केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका महिलेची अडीच लाख घेऊन फसवणूक केली आहे.

याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विमाननगर येथे राहतात. त्यांचे पती सीए आहेत.

दरम्यान त्यांचे हडपसर येथील एका बँकेत बचत खाते आहे.

मंगळवारी त्यांना एका क्रमांकावरून मॅसेज आला. त्यात केवायसी डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठीची लिंक दिली होती.

तर ही लिंक ओपन करणेबाबत मॅसेजमध्ये सांगितले होते. यादरम्यान फिर्यादी यांना काही दिवसांपूर्वीच बँकेकडून केवायसी अपडेट करण्याबाबत रजिस्टर पोस्टामार्फत पत्र आले होते.

त्यामुळे हा मेसेज बँकेकडून आला आहे, असे समजून त्यांनी लिंक ओपन केली. लिंक ओपन करताच त्यांच्या बँक खात्यावरून 14 ट्रांजेक्शन करून त्याद्वारे 2 लाख 50 हजार 558 रुपयांची फसवणूक केली आहे.

पैसे कट होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी माहीती घेतली असता फसवणूक झाल्याचे समजले.

त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक जगताप हे करत आहेत.

दरम्यान बँक कोणताही केवायसी अपडेट किंवा इतर माहितीसाठी लिंक टाकत नाही. किंवा त्यांचे मॅसेज येत.

याबाबत पोलीस प्रशासन सतत आवाहन करते. तर बँक देखील असे होत नसल्याचे मॅसेज करत असतात. मात्र तरीही नागरिक फसत आहेत.

 

डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या

 

Nashik News | काय सांगता ! होय, ‘कोविशील्ड’ची दुसरी लस घेतल्यानंतर ज्येष्ठाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तू; व्हिडीओ व्हायरल

 

नखाभोवतीच्या त्वचेची या पध्दतीनं घ्या काळजी

 

Political Party Donations | पार्टी फंडामध्ये देखील भाजपा सलग 7 वर्ष काँग्रेसच्या पुढं, जाणून घ्या राष्ट्रवादीला किती मिळाला

 

केवळ बाहेरूनच नव्हे तर आतुन देखील त्वचा ‘उजळते’, आहारात समाविष्ट करा ‘हे’ 3 ब्यूटी डिंक्स्, जाणूनघ्या