Pune Cyber Crime News | पतीची फसवणूक झाल्याचे माहिती असतानाही सायबर चोरट्यांच्या मेसेजला दिला पुन्हा प्रतिसाद; सुशिक्षितच होताहेत सायबर चोरट्याचे शिकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime News | तुमचे वीज बिल अपडेट झाले नसल्याने तुमची आज रात्री ९ वाजता वीज कट केली जाईल, असा मेसेज आल्यावर त्याला प्रतिसाद दिल्याने आजवर हजारो लोकांना सायबर चोरट्यांनी गंडा (Fraud Case) घातला आहे. अशाच मेसेजला प्रतिसाद दिल्याने पतीच्या खात्यातून सायबर चोरट्याने लाखो रुपये काढून घेतल्याचे माहिती असताना ते नाव सांगणार्‍या माणसाच्या मेसेजला पत्नीने प्रतिसाद दिला. अन तिचेही खाते रिकामे झाले. प्रामुख्याने सुशिक्षित, पण सायबर निरक्षरच सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे. (Pune Cyber Crime News)

याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिक फर्ममध्ये मॅनेजिंग डायरेक्टर (Managing Director) यांची सेक्रेटरी म्हणून काम पाहणार्‍या ५७ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४५/२३) दिली आहे. हा प्रकार ३० मे २०२३ पासून आजपर्यंत घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती (वय ६०) हे एका सीडस कंपनीचे (Seeds Company) ऑनलाईन काम पाहतात. त्यांना ३० मे रोजी तुमचे इलेक्ट्रिसिटीचे बील (Electricity Bill Update) अपडेट झाले नसल्याने तुमचे इलेक्ट्रिसिटी रात्री ९ वाजता डिसक्नेक्ट होईल, तुम्ही देवेश जोशी यांच्याशी संपर्क साधा, असा इंग्रजीत मेसेज आला. त्यांनी त्यावरील क्रमांकावर संपर्क साधून मागील बील भरल्याची रिसिट नंबरही पाठविला. त्यानंतर ते ४ जून रोजी इंदौरला गेले. तेथून ११ जूनला परत आले. दरम्यानच्या काळात त्यांच्या खात्यातून १९,९९८ रुपये, १९,९९९ रुपये, १९, ९९८ रुपये अशा प्रकारे वेगवेगळ्या रक्कमा १२ वेळा काढण्यात आल्या. त्यानंतर १२ जून रोजी ते बँकेत तक्रार करण्यासाठी गेले असतानाही त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९८१ रुपये काढून घेण्यात आले होते. (Pune Cyber Crime News)

त्याच दिवशी १२ जून रोजी फिर्यादी महिलेला देवेश जोशी असे नाव सांगणार्‍याचा व्हॉटसअ‍ॅप कॉल (WhatsApp Call) आला. तुमचे एप्रिलचे एमएसईबीचे वीज बील भरलेले दिसून येत नाही. त्यावर फिर्यादी यांनी मी एप्रिलचे बिल भरले आहे. त्याची पावती मिळालेली आहे, असे सांगितले. त्यावर त्याने तुमचे मोबाईलवर एक लिंक पाठवतो, त्यावर तुम्ही क्लिक करुन ५ रुपये रक्कमेचे पेमेंट करा. म्हणजे तुमच्या बँक खात्यातून आमच्या एमएसईबीच्या बँक खात्यात पेमेंट येत आहे की नाही हे मला तपासता येईल. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली.

आपल्या पतीच्या बँक खात्यातून ४ लाख रुपये काढले गेले असल्याचे दिसत असताना त्यांनी त्याप्रमाणे लिंकवर क्लिक करुन ५ रुपये पाठविले. त्यानंतर त्यांचे अकाऊंट अपडेट झाल्याचा मेसेज त्यांना मिळाला.

त्यानंतर १४ जून रोजी त्यांच्या पतीच्या बँक खात्यातून पुन्हा ५ हजार ७१ रुपये काढले गेले. त्यामुळे त्यांनी खात्यातील शिल्लक रक्कमेपैकी ३० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या २ हजार ५०७ रुपयांपैकी २ हजार ५०० रुपये पुन्हा काढून घेण्यात आले. पतीचे खाते रिकामे झाल्यानंतर सायंकाळी फिर्यादी महिलेच्या खात्यातून १९ हजार रुपये काढून घेण्यात आले.

एमएससीबी (MSCB) हे आता वीज कंपनीचे नाव नसून महावितरण (Mahavitaran) या नावाने ही कंपनी आहे. त्या नावानेच लोकांना बील येतात. तसेच महावितरण असे कोणतेही मेसेज पाठवत नाही, त्यावर विश्वास ठेवू नका, असा सांगितले जात असतानाही सुशिक्षित म्हणविणारे त्यावर विश्वास ठेवतात. इतकेच नाही तर पतीच्या खात्यातून लाखो रुपये काढून फसवणूक (Fraud Case) झाली असताना त्यांची पत्नी पुन्हा अशा सायबर चोरट्यांना प्रतिसाद देते आणि स्वत:ची आणखी फसवणूक करुन घेत असल्याचे दिसून आले आहे.

Web Title :   Pune Cyber Crime News | Despite knowing that her husband was cheating, she responded to cyber thieves’ messages again; Educated people are victims of cyber thieves

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा