Pune Cyber Crime | एका कार्डावरील पैसे जात असल्याची शंका असतानाही दुसर्‍या कार्डाची दिली माहिती; सेवानिवृत्त लष्करी अधिकार्‍याला साडेचार लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | वीजेचे बील अपडेट नसल्याच्या मेसेजला प्रतिसाद देऊन क्वीक सपोर्ट हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन एका लष्करी अधिकार्‍याने डाऊनलोड केले. आपल्या एका  क्रेडिट कार्डवरुन पैसे जात असल्याची शंका आल्यानंतरही त्यांनी सायबर चोरट्याला दुसर्‍या कार्डची माहिती दिली. त्याने दोन्ही क्रेडिट कार्डवरुन ४ लाख ३१ हजार रुपये ट्रान्सफर करुन फसवणूक केली. (Pune Cyber Crime)

 

याप्रकरणी येरवड्यातील त्रिदलनगर येथे राहणार्‍या एका भारतीय वायु सेनेतील ७९ वर्षाच्या सेवानिवृत्त अधिकार्‍याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रमेश कुमार आणि नाझीरकुमार (रा. हिसार, हरियाना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईलवर एमएससीबी वीजेचे कनेक्शन बंद होणार असल्याचा मेसेज आला होता. त्यातील नंबरवर त्यांनी संपर्क साधल्यावर त्यांना क्वीक सपोर्ट हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केले. राज वर्मा याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यात माहिती भरली. सायबर चोरट्याशी बोलणे सुरु असताना त्यांना त्यांच्या आयसीआयसीआय बँकेकडून तीन मेसेज प्राप्त झाले. परंतु, हे मेसेज पाहण्याअगोदर ते मोबाईल हँडसेटमधून डिलिट झाले होते. त्यांना शंका आल्याने त्यांनी फोनद्वारे राज वर्मा याला विचारणा केली. त्याने क्रेडिट कार्ड अपडेट नसल्याने पेमेंट प्रोसेसिंग पूर्ण होत नसल्याने दुसरे क्रेडिट कार्ड अथवा डेबीट कार्ड असल्यास त्याची माहिती नमूद करावी लागेल, असे सांगितले. (Pune Cyber Crime)

त्यावर त्यांनी एसबीआय बँकेतील डेबीट कार्डची माहिती दिली. त्याबरोबर त्यांना बँकेकडून ओटीपी संदर्भात मेसेज प्राप्त होऊ लागले. त्यातील एक मेसेज पाहिला असता त्यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर होत असल्याचे दिसून आले. त्यांना हा प्रकार फसवणुकीचा वाटल्याने त्यांनी सायबर चोरट्याबरोबरील चालू असलेला कॉल बंद केला. मुलाला फोन करुन सांगितले. तेव्हा त्याने तातडीने इंटरनेट कनेक्शन बंद करण्यास सांगितले. त्यांनी इंटरनेट कनेक्शन बंद केले. त्यानंतर वर्मा याने फिर्यादी यांना पुन्हा फोन केला व मोबाईल हॅन्डसेंटचे इंटरनेट कनेक्शन चालू करण्यास सांगितले. परंतु हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांना समजल्याने त्यांनी त्यास ट्रान्सफर केलेले पैसे परत करण्याबाबत सांगितले.

तेव्हा त्याने फोन बंद केला. त्यांनी बँक खात्याची तपासणी केली तेव्हा एसबीआय बँक खात्यातून ५ व्यवहार तर,
आयसीआयसीआय बँक खात्यातून २ व्यवहारातून त्यांच्या खात्यातून तब्बल ४ लाख ३१ हजार ५५३ रुपये ट्रान्सफर झाले होते.
त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
प्राथमिक तपासात हरियाना येथील दोघांच्या बँक खात्यात जमा झाले असून
या व्यवहारामध्ये फ्लिपकार्डद्वारे क्रोमा कंपनीमध्ये खरेदी झालेली असल्याची माहिती मिळाली.
येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Cyber Crime | Pune Cyber Crime Cheating Fraud With Retired Army Officer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा