पुण्यातील पोलीस उपयुक्तताच्या ‘ऑर्डरली’चा मुंबईत ‘साप’ चावल्याने ‘मृत्यु’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – पुणे पोलीस दलातील मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त यांच्या घरी ऑर्डरली म्हणून काम करत असलेल्या पोलीस शिपायाचा साप चावून मृत्यु झाला. सुनिल भगत (वय ३२) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. ही घटना कुर्ला येथील नेहरुनगर पोलीस लाईनमधील भगत यांच्या घरी सोमवारी घडली.

याबाबतची माहिती अशी, सुनिल भगत हे शिवाजीनगर मुख्यालयात नेमणूकीला आहेत. त्यांची नेमणूक मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांचे मुंबईतील वरळी येथे घर आहे. तेथे त्यांचे कुंटुबीय राहतात. भगत यांची विरेंद्र मिश्रा यांच्या घरी हाऊस ऑर्डरली अशी नेमणूक करण्यात आली. प्रत्यक्षात ते मुंबईतील मिश्रा यांच्या घरी काम करीत असत. कुर्ल्यातील नेहरुननगर पोलीस लाईन येथे ते रहात होते. घरी झोपले असताना भगत यांना साप चावला व त्यातच त्यांचा मृत्यु झाला.

भगत यांच्या मृत्युमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांची दुसऱ्या शहरात अशी नेमणूक करता येते का?. पोलीस अधिकारी आपल्या मर्जीनुसार दुसऱ्या शहरातील आपल्या घरी हाऊस ऑर्डरली म्हणून नेमणूक करु शकतात का?. जर त्यांची पुण्यातच नेमणूक केली असेल तर भगत हे सुट्टी घेऊन मुंबईला गेले होते का. गेले असतील तर त्यांनी तसा अर्ज केला होता. मात्र, या सर्व प्रश्नांवर पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे.

Visit : Policenama.com 

You might also like