पुण्यातील ‘या’ ३ तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना उद्या (८ ऑगस्ट) सुट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात मुसळधार पावसामुळे पुणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. यापूर्वी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आपत्कालीन स्थिती कायम असल्यामुळे गुरुवारी (दि. ८) पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज याबाबत आदेश जारी केला आहे. संततधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांमध्ये सोमवारी व मंगळवारी सुटी जाहीर केली होती. पुणे शहरासह काही भागात परिस्थिती सामान्य झाली आहे. परंतु जिल्ह्यातील इतर भागात अद्याप पाऊस आणि पुराच्या पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळे मावळ, मुळशी, भोर तालुक्यातील शाळा व महाविद्यालये बुधवारी बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते की, परिस्थीती पाहून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) राज्यात गुरुवारी अतीवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like