Pune : मेट्रोच्या कात्रज, निगडी, चाकण मार्गांच्या विस्तारीकरणाला चालना

पुणे : शहरातील वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट अशा मेट्रोच्या दोन मार्गांच्या कामांना लॉकडाऊन शिथिल होताच गती आली आहे. कामगारांअभावी मेट्रोचे काम खंडीत होईल, अशी शंका घेतली जात होती; मात्र महामेट्रोने त्यावर मात केली आहे. हे मुख्य मार्ग आकाराला येत असतानाच मेट्रोच्या विस्तारीकरणाच्या मागणीने जोर धरला असून तीन मार्गांच्या विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे.

यामध्ये स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा आराखडा तयार झाला आहे. सर्व पक्षांच्या संमतीने महापालिकेने हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. पिंपरी ते निगडी असा विस्तारिकरणाचा दुसरा प्रस्ताव असून केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. याच मार्गावर नाशिकफाटा ते चाकण अशा विस्ताराच्या प्रस्तावावर तपशीलवार आराखड्याचे काम सुरू झाले आहे. महामेट्रोच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कामांना प्राधान्याने गती देण्यात येईल.

याखेरीज वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली मार्गे लोहगाव विमानतळ असे विस्तारीकरणाचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. तसेच स्वारगेट ते खडकवासला आणि स्वारगेट ते हडपसर हे मार्गही प्रस्तावित आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like