
Pune Fire News | पुण्यात गणपती मंडळाच्या देखाव्याला आग ! भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या हस्ते आरती सरु असताना घडली घटना (व्हिडिओ)
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाने उभारलेल्या देखाव्याला आग लागल्याची घटना मंगळवारी (दि.26) सायंकाळी घडली Sane Guruji Tarun Mitra Mandal Catches Fire In Pune). या घटनेत जखमी किंवा जिवितहानी झाली नसल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. (Pune Fire News)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवासाठी खास देखावा उभारला आहे. मंडळाने उज्जैनच्या महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या मंदिराच्या प्रतिकृती मधील कळसाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून दोन फायरगाड्या व एक वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आला. अग्निशमन दलाने पाणी मारुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने त्याचवेळी पाऊस सुरु झाल्याने आग काही वेळातच विझली. (Pune Fire News)
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे मंडपात गणपतीच्या आरतीसाठी आले होते.
परंतु आग लागल्याचे समजताच जे पी नड्डा आरती अर्धवट सोडून बाहेर पडले. सुदैवाने लवकर आग विझल्याने मोठी दुर्घटना टळली.
गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते. याचाच प्रत्यय आज पुण्यात पाहायला मिळाला. गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या देखाव्याला आग लागल्यानंतर काही क्षणातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे आगल लगेच विझल्याने मोठी दुर्घटना टळली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sinhagad Road Traffic Changes | सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूकीत बदल
Pune Crime News | गणेशोत्सवात मोबाईल चोरी करणारी परप्रांतीय टोळी हडपसर पोलिसांकडून गजाआड,
16 लाखांचे 52 मोबाईल जप्त