पोलिस सुस्त तर चोरटे सुसाट ! पुण्यात घरफोडीच्या 4 घटनांमध्ये 11 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांचा धुडगूस काही केल्या थांबत नसून, केवळ चार घरफोड्यात चोरट्यांनी 11 लाखाहून ऐवज लंपास केला आहे. तर भरदिवसा कोंढाव्यात चोरट्यांनी पाऊण तासात घरफोडी केली आहे. त्यामुळे “पोलीस सुस्त” आणि “चोरटे मस्त” अशीच काही परिस्थिती पाहिला मिळत आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यात संदीप बधे (वय 49) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे खाडी मशीन जवळील बधे शाळेजवळ राहण्यास आहेत. कामानिमित्त दोन दिवसांपूर्वी दुपारी 2 वाजता घराला कुलूप लावून गेले होते.त्यादरम्यान चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर चढून चोरट्यांनी लोखडी शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तसेच 33 तोळे दागिने आणि दीड किलो चांदी व चांदीचे दागिने असा 9 लाख 73 हजार रुपयांचा ऐवजज चोरून नेला आहे. पावणे तीन वाजता परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

यावेळी त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यासोबतच येथीलच भाग्योदय नगरमध्येही चोरट्यांनी 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत अल्ताफ पठाण यांनी कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच हडपसर आणि बिबवेवाडीत चोरट्यांनी दोन घरे फोडत लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी हडपसर व बिबवेवाडी पोलीस तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/