‘गुगल पे’ वरुन त्याने केली ‘अशी’ फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डिजिटल इंडियाचा सध्या सर्वत्र गवगवा केला जात आहे. गुगल पे, भीम अ‍ॅप, पेटीएम अशा वेगवेगळ्या अ‍ॅपद्वारे लोक आता एकमेकांना पैसे पाठवू लागले आहे. जेवढ्या नव्या सोयी सुविधा येतात, त्याबरोबर चोरटे त्यातील लुफोल्सचा गैरफायदा घेऊन लोकांची फसवणूक करत असल्याचे यापूर्वी वारंवार दिसून आले. एका भामट्याने टायर खरेदी करायचे असल्याचे सांगून दुकानदाराला ऑनलाईन पैसे पाठवितो, असे म्हणून त्याने गुगल पे नंबर विचारुन ६९ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी रवींद्र सपकाळ (वय २३, रा. रामनगर, वारजे) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
सपकाळ यांचे बावधन येथे टायर कॉटेज दुकान आहे. त्यांना २९ जानेवारी रोजी दुपारच्या वेळी एक फोन आला. त्यावरील व्यक्तीने चार टायर विकत पाहिजे व किती पैसे होतील असे विचारले. त्याप्रमाणे त्यांनी पैसे सांगितल्यावर मी ऑनलाईन पैसे पाठवितो व माझा ड्रायव्हर नंतर गाडी घेऊन दुकानात येईल. तुम्ही टायर बसवून द्या असे सांगितले.

त्यांनी सपकाळ यांचा गुगल पे नंबर विचारुन सांगितले की मी तुमचे पैसे ऑनलाईन पाठवित आहे. तुम्हाला गुगल वर पे म्हणून मॅसेज येईल. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पैसे मिळतील, असे सांगितले. सपकाळ यांनी त्यावर विश्वास ठेवून त्याने पाठविलेल्या गुुगुल पे वरील पे मॅसेजवर क्लिक केले. पंरतु, पैसे कट झाले नाही. त्यावर त्यांनी पुन्हा मॅसेज येईल असे सांगितले. त्यानुसार ४ गुगल पे वर पे मॅसेज पाठवून त्यांना क्लिक करायला सांगितले. परंतु, त्यांना पैसे मिळाले नाहीत.

दरम्यान, त्याचा ड्रायव्हरही गाडी घेऊन न आल्याने टायर विक्री झाली नाही. त्यामुळे ते ही बाब विसरुन गेले होते. दरम्यान, त्यांनी बँक खाते चेक केल्यावर त्यांच्या खात्यातून ६९ हजार ६०० रुपये परस्पर काढून घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

तेव्हा गुगल पे किंवा कोणत्याही अ‍ॅपवरुन पैसे पाठवितो असे कोणी सांगितले तर, अगोदर त्या अ‍ॅपवरुन पैसे कसे मिळतात अथवा पाठवायचे असतात, याची माहिती करुन घ्या. त्यानंतरच व्यवहार करा. नाही तर सायबर भामट्यांचे तुम्ही शिकार होऊ शकता.

आरोग्यविषयक वृत्त –

झटपट वजन कमी करण्यासाठी ‘या’ पदार्थाचे करा नियमित सेवन

प्रसूतीनंतर या ” कारणामुळे ” गळतात केस

मलावरोध ही समस्या अनेक गंभीर आजारांचे उगमस्थान

कच्ची पपई यकृतासाठी उत्तम, इतरही आहेत अनेक फायदे