‘फार्म हाउस’वर मोबाईल ‘टॉवर’ बसविण्याच्या बाहण्याने तरुणाची ‘फसवणूक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सिंहगड पायथा येथील डोणजे गावात फार्म हाउसवर मोबाईल टॉवर बसविण्याच्या बहाण्याने तरुणाची 68 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 21 मे 2019 रोजी घडली. याप्रकरणी महेश शितोळ (रा. नवी पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश नवी पेठेत राहायला आहे. त्यांचे सिंहगड पायथा परिसरातील डोणजे गावात फार्म हाउस आहे. त्याठिकाणी मोबाईल टॉवर बसविण्यासाठी महेश यांनी एका वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार 21 ते 25 मे कालावधीत सायबर चोरट्यांनी महेशला फोन करुन फार्म हाउसवर टॉवर बसविण्यासाठी कंपनीने मान्य केल्याचे सांगितले. त्यासाठी सायबर चोरट्याने त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी म्हणून 14 हजार 300 रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी 67 हजार 800 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राम राजमाने अधिक तपास करीत आहेत.