Pune Ganeshotsav 2023 | विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ पोर्टलवर तक्रारींचा पाऊस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दहा दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर गुरुवारी (दि.28) अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणेकरांकडून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक (Pune Ganeshotsav 2023) पाहण्यासाठी शहरासह उपनगर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त पुण्यात येत असतात. त्यामुळे विसर्जन मार्गावर मिरवणूक (Pune Ganeshotsav 2023) पाहण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी होत असते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल चोरल्याचा (Mobile Thief) प्रकार समोर आला आहे. पुण्यातील लक्ष्मी रोड, टिळकर रोड, केळकर रोड आणि कुमठेकर रोडवर गुरुवारी रात्री झालेल्या गर्दीत चोरट्यांनी मोबाईल चोरल्याच्या तक्रारी पुणे पोलिसांना (Pune Police) प्राप्त झाल्या आहेत. (Pune Crime Nrews)

गणेशोत्सवात भाविकांच्या खिशातील रोकड, तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याच्या घटना प्रत्येकवर्षी घडतात. पुण्यातील विसर्जन मिरवणूक ही गणेश भक्तांचे आकर्षण असते. गुरुवारी मध्यरात्री लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोड परिसरात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरट्यांनी चोरले. (Pune Ganeshotsav 2023)

यावर्षी गणेशोत्सवात मोबाईल चोरीला गेलेल्या एक हजाराहून अधिक तक्रारी पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’
(Lost and Found) या ऑनलाइन पोर्टलवर करण्यात आल्या आहेत. प्राप्त तक्रारीवरुन विश्रामबाग
(Vishrambagh Police Station), खडक (Khadak Police Station) आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या
(Faraskhana Police Station) हद्दीत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कारण सर्वाधिक तक्रारी याच भागातून मोबाईल चोरी झाल्याच्या आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या झारखंड मधील टोळीला गजाआड करुन 50 मोबाईल जप्त केले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule | ‘जे अशी भूमिका घेतात, त्यांच्याबद्दल…’, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Pune Metro – Chandrakant Patil | गणपती विसर्जनावेळी पुणेकरांचा मेट्रोला अभूतपूर्व प्रतिसादाला सलाम ! अनंत चतुर्दशीला दीड लाखापेक्षा जास्त पुणेकरांचा मेट्रोने प्रवास

Pune Ganeshotsav 2023 | बाप्पाला निरोप देताना कुटुंबाचं मुलाकडं दुर्लक्ष, चार वर्षाच्या चिमुकल्यानं घेतला अखेरचा निरोप; मायलेकरांचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा, पिंपरी-चिंचवड परिसरातील घटना

MNS Chief Raj Thackeray | ‘…तर गालावर वळ उठतील हे निश्चित’, मुलुंड प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा; सरकारलाही धरले धारेवर