Pune Hadapsar Crime News | हडपसरमधील फुरसुंगीमध्ये एकाच कुटूंबातील तिघांच्या आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime News | हडपसर परिसरातील फुरसुंगी (Fursungi) येथील भोसले व्हिलेजमधील लक्ष्मी निवासमध्ये राहणार्‍या कुटूंबातील तिघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दोघांना उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Pune Hadapsar Crime News)

 

सुर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे Suryaprakash Harishchandra Abnave (70, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी, हडपसर – Hadapsar Police Station) यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे Janabaisurya Prakash Abnave (60) आणि चेतन सूर्यप्रकाश अबनावे Chetan Suryaprakash Abnave (41) यांना पुढील उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अबनावे कुटूंब लक्ष्मी निवासमध्ये रहावयास आहे. आज (सोमवार) त्यांनी राहत्या घराचा दरवाजा आतून बंद करून विषारी औषध प्राशन केले होते. त्यामध्ये सूर्यप्रकाश अबनावे यांचा मृत्यू झाला आहे. इतर दोघांना उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांनी एकदाच विषारी औषध कशामुळे प्राशन केले हे अद्याप समजु शकलेले नाही.
वरिष्ठ पोलस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

 

Web Title :  Pune Hadapsar Crime News | Suicide attempt of three members of the
same family in Fursungi in Hadapsar, huge excitement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा