हिंजवडीतील ३१ वर्षीय महिलेला ९ मोबाईलवरून ‘अश्‍लील’ व्हॉट्स अ‍ॅप

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – हिंजवडी येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेस वेगवेगळ्या नऊ मोबाईल क्रमांकावरून अश्लील मेसेज पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 14 ते 16 जून दरम्यान घडली. या प्रकरणी 31 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वेगवेगळ्या नऊ मोबाईल क्रमांकधारक ईशान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मोबाईल क्रमांकावर आरोपीने वेगवेगळ्या नऊ मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत तिच्या व्हाट्स अपवर अश्लील मेसेज केले. तसेच तिच्यावर लक्ष ठेवले. ईशान नावाच्या व्यक्तीने फिर्यादी महिलेला फोन करून त्रास दिला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्या’ महिलेचे स्तनांची रहस्यमय पद्धतीने वाढ, डॉक्टर्सही चिंतेत

शाकाहारी व्यक्तींनी ” प्रोटीन आणि व्हिटॅमिन ” वाढवण्यासाठी खा हे पदार्थ 

जाणून घ्या “योगा” कधी करावा 

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे 

 

 

Loading...
You might also like