Pune : पद्मावती परिसरात 4.5 लाखाची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा एक बंद फ्लॅट फोडत साडे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पद्मावती भागात घरफोडी झाली असून, काही केल्या शहरातल्या घरफोड्या थांबत नसल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी विजय गाडगीळ (वय 63) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पद्मावती येथील अमृतेश्वर सोसायटीत राहण्यास आहेत. दरम्यान 19 ते 22 सप्टेंबर या कालावधीत घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी घराचे कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. तसेच घरातील दागिने व रोकड असा एकूण 4 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ते मंगळवारी रात्री परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.