Pune : सकाळनगरला 3 फ्लॅट फोडले

ADV

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, बाणेर भागातील सकाळनगरमध्ये बंद 3 फ्लॅट फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी शिरीष जगताप (वय 68) यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सकाळनगरमध्ये राहण्यास आहेत. ते इमारतीचे सेक्रेटरी आहेत. दरम्यान त्यांच्या बिल्डींग नं. ए. 1 मधील फ्लॅट क्रमांक 5 व बिल्डिंग टी 20 येथील फ्लॅट क्रमांक 5 व 6 हे बंद होते. येथील घरमालक कुलूप लावून बाहेर गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच तीन फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. येथून नेमका माल किती गेला हे समजू शकलेले नाही. शुक्रवारी सकाळी हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विशाल पवार हे करत आहेत.