Pune : शहरात घरफोड्याचे सत्र कायम, 2 फ्लॅट फोडले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन- शहरात घरफोड्याचे सत्र कायम असून, दोन बंद फ्लॅट फोडल्याचे समोर आले आहे. पण फ्लॅट मालक गावी गेल्याने नेमका माल किती गेला हे समजू शकलेले नाही.

याप्रकरणी शाम खंते (वय ६७, रा. उंड्री) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्रीतील न्याती विन्डर्च सोसायटीत राज खिलानी आणि नैला रिझवी राहायला आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर दोन्ही कुटूंब परगावी गेले आहेत. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. घरफोडीत नेमका किती ऐवज चोरीला गेला आहे, याबाबत माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक सी. बी. गपाट करीत आहेत.