Pune : अवैध धंद्यांवर मुळासकट कारवाई करणार : पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख

शिक्रापुर – पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी थोपविण्यासाठी प्रयत्न केले जातील त्याबरोबरच अवैध धंद्यांवर मुळासकट कारवाई करण्यास प्राधान्य राहिल, असे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शिरूर येथे बोलताना सांगितले शिरूर तालुक्यासह पुणे जिल्हात अवैध धंदे, वाळू माफिया, घोडा संस्कृती (रिव्हाल्वर) या सर्व गुन्हेगारांवर चाप बसवण्याकरिता या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करत वेळप्रसंगी तडीपार ,मोक्का यासारखे गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा ही देशमुख यांनी दिला आहे.यामुळे शिरूर तालुक्यातील गुन्हेगार, वाळूमाफिया, अवैध धंदेवाले यांचे धाबे दणाणले आहे. रांजणगाव MIDC व शिरूर पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी धावती भेट दिली. यावेळी पत्रकारांशी देखील संवाद साधला.

शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण असल्याने परप्रांतीय कामगार वेपन्स सप्लाय करत असतात त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रिव्हाल्वर कट्टा संस्कृती असून याबाबत कडक कारवाई करणार असून, केवळ या गोष्टी वापरणार यांवर कारवाई नाहीतर या गोष्टी सप्लाय करणारे युपी, बिहार, एम पी येथील नागरिकांच्या मूळापर्यंत ही आम्ही जाणार आहोत.तर पुणे जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाईचा अजेंडा असून, यासाठी कायदेशीर बाबी यांचा वापर करून महसूल वनविभाग आरटीओ या सर्वांची समन्वय साधून अवैध धंदे करणारे वाळू माफिया या सर्वांच्या मुळापर्यंत जाऊन कारवाई करणार असून, या आरोपींवर वरवरची कारवाई केल्यावर हे आरोपी पुन्हा जामिनावर सुटतात आणि पुन्हा गुन्हे करत राहतात त्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे वरवरची कारवाई न करता या गुन्हेगारांना चाप बसेल अशी कारवाई झाली तर त्याचा परिणाम होतो. जुगार अवैध धंदेवाले मटका टपरीवाले अवैध गावठी दारू बनवणारे या सर्वांवर कारवाई सुरु केल्याचेही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले