Pune : प्रशासनाचा महत्वाचा निर्णय ! Remdesivir इंजेक्शनची मेडिकलमधून होणारी विक्री बंद – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे Remdesivir इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. Remdesivir ची मेडिकलमधून होणारी विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयानेच आता इंजेक्शन देण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात आता थेट रुग्णालयातून रुग्णाला हा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

शहरात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून इंजेक्शन खरेदीसाठी लोकांची झुंबड उडालेली दिसून आली. यात रुग्णालयाचे प्रिस्क्रिप्शन आणत लोक मेडिकलमध्ये गर्दी करत आहेत. तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांना इंजेक्शन मिळाले नाही. त्यात खासगी दुकानदार अव्वाच्या सव्वा किमतीने इंजेक्शन विकत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले की, शासकीय रुग्णालयात जर 2 रेमडेसिव्हिर वापरले जात असेल तर खासगीमध्ये त्याचे प्रमाण 100 टक्के असल्याचे पाहायला मिळत आहे. मुळात जर रुग्णालयात एखादा माणूस ॲडमिट आहे. तर त्याला तिथूनच इंजेक्शन पुरवले गेले पाहिजे. त्यामुळे हे निर्बंध लादण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.