‘… म्हणून आत्महत्या करतोय’, पुण्यातील प्रसिध्द उद्योगपतीची सुसाईड नोट सापडल्यानं प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे ( Pashankar Industries Group) प्रमुख गौतम पाषाणकर ( Gautam Pashankar) बुधवारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. ते बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता तपास सुरु असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट( Sucide Note) समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांना व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या ( Sucide) करत असल्याचं म्हटलं आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम पाषाणकर हे बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर त्यांनी एक बंद लिफाफा चालकाकडे दिला आणि हे घरी देण्यास सांगितले. त्यानंतर पाषाणकर ऑफिस मधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली”.

दरम्यान, पोलिसांनी या तपास सुरु केला असता या लिफ्याफ्यामध्ये सुसाईड नोट असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये त्यांनी मागील काही दिवसापासुन व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी त्यात लिहिलं आहे. यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातुन शोध घेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे आता ते नक्की कुठे आहेत हा प्रश्न सर्वांना पडला आहे

You might also like